वजन कमी करायचं? केटो डाएट फॉलो करा, जाणून घ्या

वजन कमी करायचं? केटो डाएट फॉलो करा, जाणून घ्या

वजन कमी करायचं आहे का? मग चिंता कसली. आम्ही यावर आज उपाय सांगणार आहोत. वजन कमी करण्यासाठी तुम्ही केटो डाएट फॉलो करू शकता. या केटो डाएटमध्ये (Keto Diet) 65 ते 70 टक्के चांगले फॅट्स, 20 ते 25 टक्के प्रथिने आणि फक्त 5 टक्के कार्बोहायड्रेट अशा प्रमाणात पदार्थ घेतले जातात. याविषयी सविस्तर जाणून घ्या.

वाढत्या वजनामुळे आवडीचे कपडे घालता न येणे, जाड दिसणे, अशा कारणांमुळे काही लोकांचा आत्मविश्वास खूपच कमी होतो. याशिवाय वाढलेले वजन आजारही सोबत आणते. वजन कमी करण्यासाठी अनेक जण केटो डाएट (Keto Diet) करतात. हे केटो डाएट नेमकं काय करतं, याविषयी खाली जाणून घ्या.

कार्ब ऊर्जा देण्याचे काम करतात, परंतु ते केटोमध्ये कमी होते आणि त्याऐवजी शरीराला चरबीपासून (फॅट) ऊर्जा मिळते, म्हणून अशा गोष्टींचा आहारात समावेश करावा जेणेकरून शरीराला चरबीसह (फॅट) चांगल्या प्रमाणात पोषक द्रव्ये मिळतील.

तुम्हाला केटो डाएट (Keto Diet) फॉलो करायचा असेल, पण शाकाहारी असाल तर जाणून घ्या तुम्ही तुमच्या आहारातून कोणते पदार्थ घेवू शकता. यामुळे कार्बचे प्रमाणही कमी होईल आणि शरीराला प्रथिने, चरबी तसेच इतर पोषक द्रव्ये मिळू शकतील.

‘हे’ तेल वापरा

केटो आहारात शरीराला चरबीची (फॅट) आवश्यकता असते, म्हणून स्वयंपाकासाठी ऑलिव्ह ऑइल, एवोकॅडो तेल, आणि नारळ तेल वापरावे. हे तेल फार जड नसते आणि पोषक तत्वांनी समृद्ध असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

प्रथिनांसाठी ‘हे’ शाकाहारी पदार्थ घ्या

शरीरातील प्रथिनांची कमतरता पूर्ण करण्यासाठी केटो आहार फॉलो करणाऱ्या लोकांसाठी दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. यामध्ये ग्रीक दही, हेवी क्रीम, चीज, दही, स्ट्रिंग चीज, परमेसन चीज आदींचा आहारात समावेश करता येतो.

‘या’ फॅट आणि प्रोटीनच्या गोष्टी खा

केटो आहारादरम्यान निरोगी चरबी आणि प्रथिनांसाठी हेजल नट, बदाम, अक्रोड, मॅकाडामिया नट, पेकन नट्स इत्यादींचा आहारात समावेश करावा. याशिवाय काही फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, सूर्यफूल बियाणे इत्यादींचाही आहारात समावेश करता येतो. यामुळे शरीराला व्हिटॅमिन ईपासून अनेक पोषक द्रव्ये चांगल्या प्रमाणात मिळतील.

‘ही’ फळे खा

केटो आहार फॉलो करत असाल तर रोजच्या दिनक्रमात एवोकॅडो, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी आणि लिंबू सारखी फळे खाऊ शकतात. यात कमी कार्ब असतात आणि व्हिटॅमिन सी जास्त असतात. बऱ्याच पोषक घटकांचा चांगला स्रोत यात आहे.

‘या’ भाज्या खा

तुम्ही वजन कमी करण्यासाठी केटो डाएट फॉलो करत असाल तर आपल्या आहारात फ्लॉवर, लेट्यूस, पालक, मशरूम, कांदा, शिमला मिरची, कोबी इत्यादी भाज्या ठेवा.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;