न्यूट्रिशनिस्ट टिप्स: बिझी लाइफस्टाइलमध्ये स्वत:ला फिट ठेवण्यासाठी, या ३ गोष्टी ठेवा लक्षात

न्यूट्रिशनिस्ट टिप्स: बिझी लाइफस्टाइलमध्ये स्वत:ला फिट ठेवण्यासाठी, या ३ गोष्टी ठेवा लक्षात

आपल्या सर्वांच्या बिझी लाइफस्टाइलमध्ये स्वत:ला फिट ठेवणं हे फार मोठं आव्हान आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात आपण एवढे व्यस्त असतो की स्वतःला फिट ठेवण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे ना जिममध्ये जायला मिळत ना योगा किंवा व्यायाम करायला मिळत. त्याचबरोबर बिझी लाइफस्टाइलमध्ये काटेकोर डाएट फॉलो करायलाही जमत नाही. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट विधी चावला यांनी दिलेल्या या ३ टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. डॉ. विधी चावला अनेकदा इन्स्टाग्रामवर आरोग्याशी संबंधित टिप्स शेअर करत असतात, ज्या आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. इथेही विधी यांनी अशाच टिप्स देत आहे ज्यात तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असल्यास स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात.

अशा प्रकारे स्वतःला फिट ठेवू शकतात

– न्यूट्रिशनिस्ट विधी चावला यांच्या मते, ज्या लोकांना सकाळी उठल्यावर कामात वेळ जातो तेव्हा सकाळचा नाश्ता करायला सुद्धा वेळ मिळत नसेल तर तुम्ही आदल्या रात्रीच नाश्त्याची तयारी करून ठेऊ शकता ज्याने तुमचा वेळ वाचू शकतो. जसे की तुम्हाला ओट्स बनवायचे असेल तर तुम्ही त्यात फळे आणि ओट्स एकत्र मिक्स करून रात्री दूध किंवा दही घालून वाटीमध्ये ठेवू शकता. हे तयार झालेला नाश्ता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर खाता येते. ऑफिसला जायला उशीर होत असला तरी नाश्ता सोडावा लागणार नाही.

– सोबत स्नॅक्स घेऊन जाण्याची सवयही तुम्हाला फिट ठेवेल. आपण अनेकदा बाहेरून स्नॅक्स विकत घेतो आणि खातो. परंतु लठ्ठपणा दूर ठेवण्यासाठी आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी घरबसल्या हेल्दी स्नॅक्स घेता येतात. ज्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या फळांचे काप करून सेवन करू शकता, ड्रायफ्रूट, मखाना, ड्राय फ्रूटचे लाडू, बेरी किंवा इतर कोणतेही फळ स्नॅक्समध्ये तुम्ही खाऊ शकता.

– शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. अशा वेळी स्वत:ला हायड्रेटेड ठेवणं खूप गरजेचं आहे. दिवसभर भरपूर पाणी प्यावे. याशिवाय पाण्यात चिया बिया घालून हे पाणी पिऊ शकता, नारळाचे पाणी पिऊ शकता, फळे ज्युस किंवा सूप चे सेवन करू शकता. अशी अनेक फळे आणि भाज्या आहेत ज्या खाल्ल्यावर शरीराला हायड्रेशन मिळते.

– डॉक्टर न्यूट्रिशनिस्ट विधी चावला यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही असे उपाय केले तर तुम्ही स्वतःला नक्कीच फिट ठेऊ शकता. त्यामुळे तुमच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात या गोष्टींचे पालन करा व फिट आणि तंदुरुस्त रहा.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;