चेहऱ्यावर हळद लावताना ‘या’ चुका करु नका, त्वचा होऊ शकते निस्तेज

चेहऱ्यावर हळद लावताना ‘या’ चुका करु नका, त्वचा होऊ शकते निस्तेज

हिवाळ्याच्या ऋतूत थंड हवामानामुळे त्वचा कोरडी पडू लागते, त्यामुळे चेहऱ्याची चमक कमी होते. अशा तऱ्हेने चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो, जसे की अनेक प्रकारची स्किन केअर आणि ब्युटी प्रॉडक्ट्स वापरणे आणि किचनमधील काही गोष्टी चेहऱ्यावर लावणे, जेणेकरून चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळेल. यामध्ये हळद, मध, दूध आणि अनेक नैसर्गिक गोष्टींचा समावेश आहे. काही लोकं हळदी मध्ये चेहऱ्याला सूट होईल अशा गोष्टी मिसळून पेस्ट बनवतात.आणि चेहऱ्यावर फेसपॅक लावतात.

अनेक जण बेसनाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावतात. परंतु हे घरगुती उपाय वापरण्यापूर्वी आपण आपल्या त्वचेच्या प्रकाराची काळजी घेतली पाहिजे, तसेच काही गोष्टी एकत्र वापरल्यास नुकसान होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, चेहऱ्यावर हळदीचा फेसपॅक लावल्यानंतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.

या गोष्टी मिसळू नका

चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी तुम्ही जर हळदीचा वापर करत असाल तर हळदीत लिंबाचा रस मिसळू नये. लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असते, ज्यामुळे त्वचेची जळजळ आणि लालसरपणा येऊ शकतो.

२० मिनिटांसाठी फेसपॅक लावून ठेवा

अनेक जण फेसपॅक लावून आपलं काम करायला सुरुवात करतात, पण हळदीचा पॅक २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लावू नये, कारण हळदीचा रंग गडद असतो आणि जास्त वेळ ठेवली तर ती त्वचेवर पिवळसर दिसू लागेल.

साबण वापरू नका

जेव्हा जेव्हा तुम्ही चेहऱ्यावर हळद लावाल, तेव्हा ती चेहऱ्यावरून धुवून काढताना फक्त पाण्याचा वापर करावा. २४ तास चेहऱ्यावर साबण किंवा फेसवॉश वापरणे टाळा कारण हळदीचा प्रभाव त्वचेवर काही काळ असतो. याशिवाय पाण्याने चेहरा धुण्याबरोबरच मॉइश्चरायझर लावावे.

कसे वापरावे

चेहऱ्यावर हळद वापरण्यासाठी हळदीमध्ये बेसन, कोरफड, दूध किंवा मध घालू शकता. जर तुम्हाला मध मिळत असेल तर तुम्ही याआधी हळद थोडी भाजून घेऊ शकता, यामुळे चेहऱ्यावर हळदीचा पिवळा रंग येत नाही. लक्षात ठेवा की जर कोणाला हळद किंवा कोणत्याही नैसर्गिक गोष्टीची ॲलर्जी असेल तर त्याचा वापर टाळा तसेच लावण्याआधी ती पेस्ट चेहऱ्याऐवजी हातावर लावण्याचा प्रयत्न करा.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;