चांगली झोप हीच आरोग्याची गुरुकिल्ली, शांत झोपेसाठी या टीप्स आवश्य फॉलो करा

चांगली झोप हीच आरोग्याची गुरुकिल्ली, शांत झोपेसाठी या टीप्स आवश्य फॉलो करा

काही लोकांना रात्री शांत झोप लागत नाही. तुम्हालाही असं होतं असेल तर ही बातमी नक्की वाचा. एक लक्षात ठेवा की, तुम्ही चांगली झोप घेत असाल तर तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकतात. याउलट कमी झोपेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.

काही लोकांना रात्री झोप लागत नाही कारण त्यांचे मन शांत राहू शकत नाही. यामुळे ते वारंवार जागे होतात किंवा रात्री उशिरापर्यंत झोपत नाहीत. असं झाल्यानं अर्थातच झोपेत व्यत्यय येतो. तुम्हीही रात्री झोपताना नकारात्मक विचारांमुळे त्रस्त असाल तर झोपण्यापूर्वी काही टिप्स फॉलो करू शकता. या टिप्समुळे तुमचे मन शांत राहील आणि झोप चांगली लागेल. जाणून घ्या.

अनेकांना पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमधला ताण खूप जास्त असतो. यामुळे रात्री झोपायला गेल्यावर मेंदूमध्ये अस्वस्थता निर्माण होते किंवा विचार येऊ लागतात. यामुळे झोप नीट येऊ शकत नाही. ही समस्या जास्त काळ कायम राहिल्यास मानसिक आरोग्याबरोबरच शारीरिक समस्यांवरही वाईट परिणाम होतो. चला तर मग जाणून घेऊया मन शांत करण्यासाठी झोपण्यापूर्वी काय करावे.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून दूर राहा

आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. यामुळे मुलं रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. जर ही सवय असेल तर फोन ठेवल्यानंतरही तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी सुमारे एक तास आधी फोन, टीव्ही, लॅपटॉपपासून दूर राहा.

चिंता थांबवा

उद्याच्या कामाची चिंता वाटत असेल आणि त्यामुळे मन शांत राहू शकत नसेल तर हे टाळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कामाला सुरुवात करा. म्हणजेच सकाळी नाश्ता करायचा असेल तर तयारी करा आणि त्याचप्रमाणे उद्याच्या ऑफिसच्या कामासाठीही प्लॅन बनवू शकता, यामुळे तुमची चिंता कमी होईल.

योगा करा

चांगल्या झोपेसाठी दररोज झोपण्यापूर्वी योगा केला जाऊ शकतो. या योगासनांमुळे शरीराला आराम मिळतो तसेच मानसिकरित्याही तुम्ही एक प्रकारे बळकट बनतात. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योगा करू शकतात.

कोमट दुधात ‘या‘ गोष्टी घ्या

तुम्ही रात्री तणावामुळे जागे असाल तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी कोमट दुधात थोडी हळद किंवा चिमूटभर जायफळ पावडर मिसळून प्यावे. हे दोन्ही मसाले तणाव कमी करून झोप सुधारण्यास मदत करतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;