हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल आले आणि गाजरचे सूप, जाणून घ्या रेसिपी

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल आले आणि गाजरचे सूप, जाणून घ्या रेसिपी

हिवाळ्यात अनेकदा आपल्याला काहीतरी गरम पिण्याची इच्छा होते. पण अशावेळी काय प्यावे हे कळत नाही. तर गाजर आणि आल्याचे सूप तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. गाजर आणि आले दोन्ही जीवनसत्वे आणि खनिजे समृद्ध आहे. गाजर मध्ये बीटा कॅरोटीन असते. जे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते आणि डोळ्यांसाठी खूप चांगले असते. त्याचवेळी आल्यामध्ये जिंजरॉल असते जे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे आणि जळजळ कमी करण्यास मदत करते.

गाजर आणि आल्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून आपले संरक्षण करतात. त्यासोबतच आले पचन सुधारण्यास मदत करते. त्यामुळे पोटातील गॅस आणि अपचन कमी होते. याशिवाय आल्यामध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म असतात. जे स्नायू दुखणे आणि डोकेदुखी कमी करण्यास मदत करतात. जाणून घेऊया गाजर आणि आल्याचे सूप बनवण्याची रेसिपी.

साहित्य

गाजर ४ ते ५ (किसलेले)

एक इंच अद्रक (किसलेले)

कांदा १

लसूण पाकळ्या २ ते ३

तेल १ चमचा

जिरे 1/2 चमचा

हळद पाउडर 1/4 चमचा

धणे पावडर 1/2 चमचा

लाल तिखट 1/4 चमचा

मीठ

पाणी

कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करा. त्यात जिरे टाका आणि ते तडतडू द्या. नंतर कांदा आणि लसूण घालून सोनेरी होईपर्यंत परता.

आता त्यात किसलेले गाजर आणि आले घालून दोन ते तीन मिनिटे परतून घ्या.

आता त्यामध्ये हळद, धने पूड, तिखट आणि मीठ घालून मिक्स करा.

यानंतर चार कप पाणी घालून मंद आचेवर 15 ते 20 मिनिटे किंवा गाजर मऊ होईपर्यंत शिजवा.

नंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या. मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून गुळगुळीत पेस्ट बनवा.

आता सूप पुन्हा पॅनमध्ये टाका आणि गरम करा. सूप कोथिंबिरीने सजवा आणि सर्व्ह करा.

गाजर आणि आल्याच्या सूपचे फायदे:

आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

आले पचन सुधारण्यास मदत करते आणि गॅस तसेच बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.

गाजर मध्ये व्हिटॅमिन ए असते जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.

गाजरामध्ये असलेले व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी देखील चांगले आहे.

या सूप मध्ये कॅलरीज कमी असल्याने वजन कमी करण्यास देखील मदत होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;