थंडीत सांधेदुखीत होते वाढ,या उपायांनी मिळेल आराम, पाहा कोणते ?

थंडीत सांधेदुखीत होते वाढ,या उपायांनी मिळेल आराम, पाहा कोणते ?

थंडीच्या दिवसात तापमान घटल्याने सर्दी, खोकला होतो.तसेच अनेक वेळा सांधेदुखीचा त्रास होणाऱ्यांना देखील या काळात खूप त्रास होतो. तसेच स्नायू आखडतात. खास करुन ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास होत असतो. ज्या लोकांना संधीवाताचा त्रास होतो.त्यांनी थंडीत अधिक काळजी घेण्याची गरज असते. थंडीच्या दिवसात स्नायू आखडत असल्याने मसल्स स्टीफनेस आणि जॉइंट पेनपासून सुटका मिळविण्यासाठी काही साध्या टीप्सचा फॉलो करुन दुखण्यापासून आराम मिळू शकतो…

थंडीत घराबाहेर न पडल्याने शरीराला विटामिन्स डी अजिबात मिळत नाही. त्यामुळे शरीरातील स्नायू आखडून जातात. जर तुम्ही बैठा जॉब करत असाल तर दर अर्ध्या तासाने किंवा 40 मिनिटानी दोन ते तीन मिनिट चालणे आवश्यक असते. तर आपण पाहूयात थंडीत स्नायू आखडने आणि संधीवाताचा त्रास होत असेल तर काय उपाय योजावेत ते पाहूयात…

घरातील या वस्तूपासून तेल तयार करावे

संधीवात आणि हाडांच्या दुखण्यापासून सुटका मिळविण्यासाठी घरातील काही वस्तूंचे तेल तयार करावे आणि तेल वापरावे. राईच्या तेलात काही लवंगा, ओवा, लसूण आणि आल्याचा कुट यांचे मिश्रण उकळावे. त्यानंतर ते थंड करुन नीट गाळून घ्यावे. हे तेल काचेच्या बरणीत भरुन ठेवावे. त्याचा वापर सांध्याच्या मसाजासाठी करावा.

दररोज स्ट्रेचिंगचा व्यायाम करावा

थंडीत सांधे दुखी आणि स्नायूंच्या आखडण्याने होणाऱ्या दुखण्यापासून सुटका मिळविण्यासाठी रोज हलका फुलका व्यायाम करावा. हाता पायचे स्नायूंना स्ट्रेचिंग करणारे सोपे व्यायाम करावेत. त्यामुळे स्नायू मोकळे होतील आणि आराम मिळेल. दररोज असा स्ट्रेचिंग व्यायाम केल्याने आपल्याला हालचाली करताना फारसे दुखणार नाही.

या पदार्थांना वर्ज्य करावे

सांधेदुखीचा त्रास थंडीत बळावत असतो. त्यामुळे आपल्या आहारावर नीट लक्ष द्यावे. सांधेदुखी किंवा संधीवात या आमंत्रण देणारे शरीरात प्युरिन तयार करणारे पदार्थ खाणे टाळावे. मिठाई, ग्लुटेनवाले पदार्थ, तळलेले पदार्थ यापासून दूर राहायला हवे. तसेच पाणी भरपूर प्यावे.

हीटींग पॅडचा वापर करावा

थंडीच्या दिवसात संधीवात आणि सांधेदुखीचा त्रास होत असल्याने घरात एक हिटींग पॅड असावा.त्यामुळे या गरम करुन दुखऱ्या भागावर शेक द्यावा त्याने आराम मिळतो. जर हिटींग पॅड नसेल तर काचेच्या एअर टाईट बॉटलमध्ये गरम पाणी भरुन त्याला कपड्यात लपेटून शेक घ्यावा. जर गरम पाण्याची रबरी पिशवी मेडीकल मधून आणून त्याचा ही अंग शेकण्यासाठी वापर करता येईल.

कपडे कोणते वापरावे

थंडीत गरम कपडे परिधान करावेत. परंतू हे कपडे लोकरीचे असतील तर उत्तमच पण जास्त टाईट नसावेत. त्यामुळे दैनंदिन कामात आपल्या अडथळा येणार नाही.

( सूचना – ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करा )

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;