लहान मुलांना दुधाच्या बॉटलने दूध पाजताय तर सावधान, हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

लहान मुलांना दुधाच्या बॉटलने दूध पाजताय तर सावधान, हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

बदलते हवामान, प्रदूषण आणि थंडी यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. हिवाळ्यात मुलांना सर्दी-खोकल्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. पण ही सर्दी दीर्घकाळ राहिल्यास त्याचे निमोनियामध्ये रुपांतर होण्याचा धोका असतो. बाटलीतून दूध पिणाऱ्या मुलांना न्यूमोनिया होण्याचा धोका 10 पट जास्त असतो. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, लहान मूल जेव्हा बाटलीतून दूध पितात, तेव्हा अनेकदा झोपेतही बाटली तोंडात राहते. त्यामुळे ते दूध श्वास नलिकेत जमा होऊ लागते. हळूहळू जेव्हा हे दूध जमा होऊ लागते, तेव्हा संसर्ग होतो आणि येथूनच न्यूमोनिया सुरू होतो.

बदलत्या हवामानामुळे 1 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना डायरिया, न्यूमोनिया आणि सर्दी धोका असल्याचे डॉक्टर सांगतात. सर्दी-खोकला दीर्घकाळ राहिल्याने त्यामुळे ताप येऊ लागतो. श्वास घेत असताना आवाज येऊ लागतो. श्वास वेगाने सुरू होतो. निमोनियावर वेळेवर उपचार न केल्यास, संसर्ग वाढू लागतो आणि बरगड्यांना आणि श्वासनलिकेमध्ये पू होतो. अशा परिस्थितीत मुलांना श्वास घेताना त्रास होतो. मुलाचा मृत्यूही होऊ शकतो.

निमोनिया कधी धोकादायक होतो?

संसर्ग वाढत जातो तेव्हा फुफ्फुसात पू तयार होत. ज्याला नळीद्वारे बाहेर काढले जाते. ही न्यूमोनियाची अत्यंत धोकादायक स्थिती आहे. मुलाला या परिस्थितीत येण्यापासून वाचवायचे आहे आणि त्यासाठी वेळीच आवश्यक पावले उचलली पाहिजेत.

निमोनियापासून मुलाचे संरक्षण कसे करावे?

मुलाच्या खोलीत धूर किंवा डास प्रतिबंधक अगरबत्ती लावू नका.

शक्य तितके मुलाला खायला द्या आणि जर मूल खात असेल तर त्याला निरोगी अन्न द्या.

ज्या माता आपल्या मुलांना दूध पाजतात त्यांनी अति थंडीत जाणे टाळावे आणि सकाळी फिरायला जाणे टाळावे.

मुलाला थंडीपासून वाचवण्यासाठी, मुलाला कोरडे आणि स्वच्छ कपडे घाला आणि स्वच्छतेची काळजी घ्या.

बाळाला वेळेवर लस द्या आणि निमोनियाची लसही वेळेवर घ्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;