नाक वारंवार बंद होतंय? वास येत नाही? असू शकते १०० हून अधिक आजारांचे लक्षण

नाक वारंवार बंद होतंय? वास येत नाही? असू शकते १०० हून अधिक आजारांचे लक्षण

नाक बंद असताना कोणत्याही गोष्टीचा वास न येणे हे एक सामान्य लक्षण आहे. पण दीर्घकाळ वास न येणे हे धोकादायक ठरू शकते. शंभराहून अधिक रोगांचे प्रारंभिक लक्षण म्हणजे कोणत्याही गोष्टीचा वास न येणे. त्यामुळे जर तुम्हाला ही बऱ्याच काळापासून कोणत्याही प्रकारचा वास येत नसेल, तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण एका संशोधनानुसार हे अनेक प्रकारच्या आजारांमुळे देखील होऊ शकते. अनेकदा काही विशिष्ट आजारामुळे लोकांना कोणत्याही प्रकारचा दुर्गंध जाणवत नाही. थंडीत नाक बंद होण्यापासून ते कोविडमध्ये लोकांना काहीही वास न येण्यापर्यंत अशी लक्षणेही आपण पाहिली आहेत.

कोणत्याही प्रकारचा दुर्गंध जाणवणे ही आपल्या पाच इंदिरांपैकी एक आहे जे आपल्याला लहानपणापासूनच मिळते परंतु काही आजारांमुळे आपली ही भावना काम करणे थांबून जाते. त्यामुळे आपली कोणत्याही गोष्टीचा वास घेण्याची क्षमता नष्ट होते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, 139 वैद्यकीय परिस्थिती आहेत ज्यामध्ये कोणताही वास घेण्याची आपली क्षमता नष्ट होते.

संशोधन काय सांगते?

चार्ली डनलॉप स्कूल ऑफ बायोलॉजीकल सायन्सेसच्या संशोधकांनी, द ऑक्सफर्ड रिसर्च सेंटर इन द ह्युमॅनिटीच्या सहकार्याने असे संशोधन केले आहे, ज्यामध्ये अशा प्रकारच्या 139 वैद्यकीय परिस्थितीचा मानवी वास घेण्याच्या क्षमतेशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. ज्यामुळे रुग्ण कोणत्याही प्रकारची दुर्गंधीचा वास घेऊ शकत नाही. हे लक्षण अगदी सामान्य मानले जात असले तरी देखील हे विविध न्यूरोलॉजिकल आणि शारीरिक रोगांचे प्रारंभिक लक्षण असू शकते. त्याचा संबंध एखाद्या व्यक्तीच्या स्मरणशक्तीशीही असल्याचा आढळून आले आहे.

कोणत्या रोगांशी संबंध?

अलझायमर आणि पार्किन्सन्स सारख्या आजारांशी देखील संबंध आहे . कोरोना व्हायरस आणि सायनुसायटीस सारख्या प्रमुख आजारांशी देखील याचा संबंध आहे. या संशोधनानुसार जर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही गोष्टीचा वास न आल्यासारखी लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण हे आजारांची प्रारंभिक लक्षणे असू शकतात.ज्याद्वारे रुग्णांवर उपचार करता येवू शकतात.वेळीच उपचार घेतले तर आजार वाढण्यापासून रोखणे देखील शक्य होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;