रिकाम्या पोटी कढीपत्ता खाऊन हे आजार पळवा दूर

रिकाम्या पोटी कढीपत्ता खाऊन हे आजार पळवा दूर

स्वयंपाक घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींनी अनेक आजार बरे होतात. स्वयंपाक करतांना कढीपत्त्याचा वापर फक्त चव आणि सुगंध वाढवण्यासाठीच केला जातो. पण अनेकदा आपल्याला त्याच्या आरोग्यदायी गुणधर्मांची माहिती नसते. रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. कढीपत्त्यात आढळणारे अँटिऑक्सिडंट, जीवनसत्वे आणि खनिजे शरीरासाठी फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्यास त्याचे अनेक चमत्कारी फायदे होतात. जाणून घेऊया कढीपत्ता खाल्ल्याने कोणते फायदे होतात.

हृदयाचे आरोग्य सुधारते:

कढीपत्त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट आणि फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल यामुळे कमी होते आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो.

केस आणि त्वचेसाठी फायदेशीर:

कढीपत्त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचा स्वच्छ होते. कढीपत्ता नियमितपणे खाल्ल्याने केस मजबूत होता आणि त्वचा स्वच्छ होते. पांढरे केस आणि केस गळती थांबवण्यासाठी कढीपत्त्याचा वापर केला जाऊ शकतो.

वजन कमी करण्यास मदत करते:

कढीपत्त्यामध्ये आवश्यक पोषक घटक आणि फायबर असतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी हे मदत करतात आणि चयापचय गतिमान करतात त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

डोळ्यांसाठी फायदेशीर:

विटामिन ए कढीपत्त्यात मुबलक प्रमाणात असते जे डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. दृष्टी संबंधित इतर समस्या आणि मोतीबिंदू दूर ठेवण्यास देखील यामुळे मदत होते.

पचन समस्येवर गुणकारी:

कढीपत्त्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. रिकाम्या पोटी सकाळी कढीपत्ता खाल्ल्याने पोटदुखी, गॅस आणि बद्धकोष्ठते सारख्या समस्यांपासून आराम मिळतो कढीपत्ता खाल्ल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास कमी होतो.

कसे करा कढीपत्त्याचे सेवन

कढीपत्त्याची पाच ते सहा पाने सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने त्याचा फायदा होतो. एक ते दोन महिने सतत याचे सेवन केल्याने त्याचे फायदे तुम्हाला मिळतील. जर तुम्हाला चवीला हे कडू वाटत असेल तर एक ग्लास पाण्यात सोबत देखील ही पाने खाऊ शकता.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;