ट्रेडमिलवर धावताये? तर तुम्हीही ठरू शकता ‘या’ समस्येचे बळी, जाणून घ्या फायदे तोटे

ट्रेडमिलवर धावताये? तर तुम्हीही ठरू शकता ‘या’ समस्येचे बळी, जाणून घ्या फायदे तोटे

हिवाळा सुरु झाला की जिमला जाणाऱ्या लोकांची संख्याही वाढते. पिळदार शरीर बनवायला कुणाला नाही आवडत. पण, त्याचवेळी आपन करत असलेल्या व्यायामाच्या प्रकाराची परिपूर्ण माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला ट्रेडमिल याचे फायदे आणि तोटे, अशा दोन्ही गोष्टी सांगणार आहोत.

आजच्या काळात फिट राहणे हे एखाद्या मोठ्या आव्हानापेक्षा कमी नाही. फिटनेससाठी लोक डायटिंगपासून ते जिममध्ये जड व्यायामापर्यंत सर्व पर्याय आजमावतात. त्याचबरोबर शरीराला फिट ठेवण्यासाठी ट्रेडमिलवर धावणे बहुतांश लोकांना आवडते. ट्रेडमिल रनिंग लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. याचविषयी आम्ही आज सखोल माहिती देणार आहोत.

अनेकदा धावण्यासाठी बाहेर जायला वेळ नसतो. या लोकांसाठी ट्रेडमिल अधिक फायदेशीर आहे. अर्थात, ट्रेडमिलवर धावणे खूप फायदेशीर आहे, परंतु त्यात काही जोखीम देखील आहेत. ट्रेडमिलवर धावण्याचे फायदे आणि तोटे काय असू शकतात. चला जाणून घेऊया

ट्रेडमिलवर धावण्याचे फायदे कोणते?

सोयीस्कर: ट्रेडमिलवर धावण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण कधीही धावू शकता. थंडी असो वा उन्हाळा, ट्रेडमिल हे इनडोअर मशीन आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार कधीही धावू शकता.

सांध्यासाठी: ट्रेडमिलमध्ये एक निश्चित कुशनिंग सिस्टम असते, ज्यामुळे सांध्यावरील परिणाम कमी होतो. ज्यांना गुडघे, टाच किंवा नितंब दुखण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

स्पीड कंट्रोल: ट्रेडमिलमधील वेग आणि उतार तुम्ही स्वत:नुसार सहज नियंत्रित करू शकता. याद्वारे तुम्ही तुमच्या फिटनेस लेव्हलनुसार व्यायाम करू शकता.

ट्रेडमिलवर धावण्याची जोखीम काय?

जर आपण ट्रेडमिलवर जास्त वेळ धावत असाल तर यामुळे कंटाळा येऊ शकतो. हे आपली प्रेरणा कमी करू शकते. ट्रेडमिलवर जास्त वेगाने धावल्याने सांधे आणि स्नायूंमध्ये ताण येऊ शकतो. अशावेळी गुडघे आणि पाठदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे, ट्रेडमिलवर धावणे शरीराचे नैसर्गिक धावण्याचे रूप बदलू शकते. जमिनीवर धावण्याच्या तुलनेत ट्रेडमिल बेल्ट पाय मागे खेचतो. यामुळे शरीराची नैसर्गिक हालचाल बिघडू शकते.

व्यायाम करताना काळजी घ्या

कोणताही व्यायाम करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. कारण, याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे योग्य प्रकारे व्यायाम करणे गरजेचे आहे. अनेकदा आपण एखादा व्हिडिओ पाहून व्यायाम करण्याचा प्रयत्न करतो. पण, हे शक्यतो टाळावे. योग्य मार्गदर्शन घेऊनच व्यायाम करावा.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;