कतरिनाच्या दंडावरील तो पॅच पाहून चाहत्यांकडून काळजी व्यक्त; अभिनेत्रीला नेमका कोणता आजार?

कतरिनाच्या दंडावरील तो पॅच पाहून चाहत्यांकडून काळजी व्यक्त; अभिनेत्रीला नेमका कोणता आजार?

अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतंच तिला मुंबईतील कलिना एअरपोर्टवर पाहिलं गेलं. नवरात्री उत्सवात सहभागी होण्यासाठी कतरिना निघाली होती. यावेळी तिने सुंदर साडी नेसली होती. डिझायनर साडीतील कतरिनाच्या खास लूकने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. मात्र त्याहीपेक्षा कतरिनाच्या दंडावरील एका छोट्याशा काळ्या पट्टीची सोशल मीडियावर अधिक चर्चा झाली. कतरिनाच्या उजव्या दंडाच्या मागे काळ्या रंगाचा एक पॅच दिसला होता. हा पॅच पाहून तिला डायबिटीज आहे की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांमध्ये उपस्थित झाला.

कतरिनाने तिच्या दंडावर ‘अल्ट्रा ह्युमन’चं हेल्थ मॉनिटर पॅच लावलं होतं. या एम 1 ग्लुकोज मॉनिटरिंग पॅचमुळे रिअल टाइममध्ये शरीरातील ग्लुकोजच्या पातळीवर लक्ष ठेवण्यास मदत होते. आपण दिवसभरात जे खातो आणि ज्या लाइफस्टाइलचं पालन करतो, त्याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतोय हे यातून स्पष्ट होतं. बायोमार्कर म्हणून ग्लुकोजचा वापर करून शरीराच्या चयापचय कार्याचा मागोवा घेणं या M1 ग्लुकोज मॉनिटरिंग पॅचने शक्य होतं. शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आपण काय खावं आणि व्यायाम कसं करावं, हे जाणून घेण्यासही मदत होते.

हे पॅच एका ॲपशी कनेक्ट केलं जाऊ शकतं. या ॲपद्वारे शरीरातील ग्लुकोजच्या पातळीचं रिअर-टाइम ट्रेंड तपासलं जाऊ शकतं. हे ॲप शरीरातील ग्लुकोजच्या प्रतिसादावर आधारित वैयक्तिक आहार आणि व्यायामाच्या टिप्स सुचवण्यासही मदत करते. हे एक पॅच दोन आठवड्यांसाठी वापरलं जाऊ शकतं आणि त्याची किंमत 7499 रुपये इतकी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pallav Paliwal (@pallav_paliwal)

हे डाएबिटीक पॅचेस कन्टीन्यूअस ग्लुकोज मॉनिटर्स (CGMs) म्हणूनही ओळखले जातात. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर सतत लक्ष ठेवण्यासाठी त्याची मदत होती. या पॅचमध्ये ग्लुकोज सेन्सिंग पॉलिमर असतो, जो पेशींमधील द्रव पदार्थातील ग्लुकोजची पातळी मोजतो. मधुमेहाचं व्यवस्थापन करणाऱ्या लोकांसाठी, त्यांना किती इन्सुलिन आवश्यक आहे हे निर्धारित करण्यासाठी रक्तातील साखरेचं निरीक्षण करणं आवश्यक असतं.

जे चांगलं लाइफस्टाइल फॉलो करू इच्छितात, ते ग्लुकोज मॉनिटरिंग पॅचचा वापर करू शकतात. टाइप 2 मधुमेह, लठ्ठपणा, पीसीओएस, उच्च रक्तदाब आणि इतर चयापचय विकार यांसारखे आजार असलेल्या लोकांनाही या पॅचचा फायदा होऊ शकतो. शरीरातील स्थिर ग्लुकोज पातळी ही शारीरिक कार्यक्षमता सुधारण्यात आणि ऊर्जेची पातळी टिकवून ठेवण्यासदेखील मदत करते.

टिप: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशासाठी आहे. यातून कोणताही व्यावसायिक वैद्यकीय सल्ला देण्याचा प्रयत्न नाही. वैद्यकीय स्थितीबद्दल कोणतेही प्रश्न असल्यास नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;