Mpox ची जगभरात दहशत, तब्बल इतक्या लोकांनी गमावले प्राण, भारताच्या वेशीवर भयानक आजार

Mpox ची जगभरात दहशत, तब्बल इतक्या लोकांनी गमावले प्राण, भारताच्या वेशीवर भयानक आजार

मंकीपॉक्सने जगभरात दहशत निर्माण केली आहे. युरोप आणि आशियामध्ये मंकीपॉक्सने आजाराने हाहाकार माजवला आहे. आजार धोकादायक स्थितीत पोहोचल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने MPOX ला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. दरम्यान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मुंबई विमानतळावर चाचणी आणि क्वारंटाईन सुविधा सुरू करण्यास सांगितलं आहे.

एक्सवर पृथ्वीराज चव्हाण यांनी शिंदे यांना पत्र पाठवलं आहे. ‘Mpox विषाणू जगभरात पसरत आहे. तो आपल्या शेजारी पोहोचला आहे. High risk देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर कठोर चाचणी आणि विलगीकरण प्रोटोकॉल लागू करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.’ पृथ्वीराज चव्हाण यांनी लिहिलेलं पत्र सध्या चर्चेत आहे.

 

 

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोच्या आरोग्य मंत्रालयाच्या महामारीविषयक रिपोर्टनूसार, आरोग्य मंत्री रॉजर काम्बा म्हणाले की, 2024 च्या सुरुवातीपासून या देशात 15,664 लोकांना मंकीपॉक्सची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे, तर यातील 548 लोकांचे आजाराने प्राण घेतले आहेत. देशातील सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये इक्वेटूर, साउथ किवु, साउथ उबांगी, संकुरु, त्शुआपा, मोंगला आणि त्शोपो यांचा समावेश आहे.

कांगो देश 2022 पासून मंकीपॉक्स सारख्या गंभीर आजाराचा सामना करत आहे. आफ्रिकेबाहेर, युरोपमधील स्वीडन आणि आशियातील पाकिस्तानमध्येही एमपीक्सची प्रकरणे नोंदवली गेली असल्याची माहिती समोर येत आहे. याचा अर्थ हा आजार भारताच्या वेशीवर आला आहे. त्यामुळे भारतीयांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे.

मंकीपॉक्सचा वाढता धोका पाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे सरचिटणीस पीके मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, 17 ऑगस्ट रोजी आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये या आजाराबाबत आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्वतः मोदी याकडे लक्ष ठेवून आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;