रेड पेअरचे फायदे अपरंपार, हृदयाचं आरोग्य होईल सदृढ, प्रेग्नंसीतही लाभ

रेड पेअरचे फायदे अपरंपार, हृदयाचं आरोग्य होईल सदृढ, प्रेग्नंसीतही लाभ

फळांनी आपल्या शरीराला पोषकतत्व मिळत असतात. फळांना रोजच्या डाएटमध्ये सामील केल्याने आपल्याला मोठे लाभ मिळतात. त्यामुळे डॉक्टरांपासून ते घरातील वयस्कर मंडळी मुलांना फळे खाण्याचा सल्ला देत असतात.प्रत्येक मोसमातील फळांचा आस्वाद घ्यायलाच हवा. रेड पेअर ( Red Pears ) हे फळ ज्याला हिंदीत लाल नाशपाती असे नाव आहे. हे फळ पावसाळ्यात मिळते हे फळ आरोग्यासाठी महत्वाचे आहे. रेड पेअर या फळाला गरीबांचे सफरचंद म्हणतात. हे फळ खूपच आरोग्यदायी फळ आहे. या फळाचा आहारात समावेश केल्याने खूपत फायदे मिळतात. त्यामुळे आपले आरोग्य सुधारते. अनेक लोकांना या फळाबाबत फारसी माहिती नाही. चला तर पाहूयात रेड पेअरच्या खाण्याने आरोग्याला काय फायदा होतो.

रोग प्रतिकारकशक्ती वाढते –

रेड पेअरमध्ये सी विटामिन्स भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे लाल पेअर फळ आपली इम्युनिटी वाढण्यासाठी उपयोगी पडते. या फळात कॉपरची तत्वे देखील खूप असतात. ज्यामुळे इन्फेक्शन पासून लढण्याची ताकद मिळत असते.

गर्भवती महिलांसाठी उपयोगी –

जर गर्भवती महिलांनी रेड पेअरचा वापर आहारात केला तर खूपच आरोग्याला फायदा मिळतो. यात फोलिक एसिड असल्याने कोणत्याही अनुवंशिक विकलांगतेला हे फळ रोखते. आणि आई आणि बाळाच्या आरोग्याचे रक्षण करते.

पचनव्यवस्था सुधारते –

पचन व्यवस्था सुधारण्यासाठी देखील हे रेड पेअर फायदेशीर ठरते. रेड पेअरमध्ये फायबर आणि पोटॅशियम भूरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ब्लड प्रेशर देखील सामान्य राहण्यासाठी मदत होते. तसेच हृदयरोगात देखील हे फळ सेवन करणे फायदेशीर सिद्ध होते.

ब्लड शुगर कंट्रोल करते –

रेड पेअरमध्ये एंथोसायनिन भरपूर असते. त्यामुळे ब्लड प्रेशर सामान्य राहाण्यास मदत मिळते. त्यामुळे रेड पेअर याला आहारात सामील केल्यास टाईप – 2 डायबिटीजची धोका करण्यास मदत मिळते.

फ्रि रेडिकिल्सपासून बचाव –

रेड पेअरमध्ये विटामिन्स ए,सी आणि के भरपूर असते. त्यामुळे फ्रि रेडिकिल्स पासून वाचता येते. या फळात एंटिऑक्सीडेंट तत्व खूप आढल्याने त्यामुळे पेशी डॅमेज होण्यापासून वाचतात.

( सावधान : ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तुमच्या फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधावा )

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;