सावधान ! तुम्ही देखील कॅन्सरवाला चहा तर पित नाही ना? मंच्युरियन नंतर आता चहाचा नंबर

सावधान ! तुम्ही देखील कॅन्सरवाला चहा तर पित नाही ना? मंच्युरियन नंतर आता चहाचा नंबर

नवी दिल्ली : चहाचा वेळ झाली की तो कधी समोर येतो असं होतं. चहा प्यायला अनेकांना आवडतं. चहा आवडत नाही असं म्हणणारे क्वचितच लोकं भेटतात. काहींना चहा न पिल्याने डोकेदुखी दूर होते. पावसाळ्यात तर चहाची मागणी आणखी वाढतेय. पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर चहा पिण्याची मजाच वेगळी असते. चहाच्या टपरीवर तुम्ही देखील चहा पित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तुम्हाला माहीत आहे का की, चहामुळे देखील कॅन्सर होऊ शकतो? होय, आता तुमचा लाडका चहावाला देखील भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या तपासणीत आला आहे. कोबीचे मंचुरियन, पाणीपुरी, कॉटन कँडी आणि कबाब सारख्या खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या फूड कलरवर बंदी आणल्यानंतर आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

चहाच्या पानांवर किटकनाशके

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना चहाच्या पानांमध्ये प्रक्रियेदरम्यान कीटकनाशके आणि रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आढळून आले आहे. जे लोक खाद्यपदार्थ बनवतात आणि विकतात ते रोडामाइन-बी आणि कार्मिसिन सारख्या खाद्य रंगांचा वापर करतात. हे रंग अत्यंत विषारी मानले जातात. चहाच्या पानांवर कीटकनाशके वापरले जातात. ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो. कर्नाटकचे आरोग्य मंत्रालय लवकरच अशा चहाच्या बागांवर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे जे चहा पिकवताना जास्त प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करतात.

आरोग्यासाठी घातक चहा

कर्नाटक आरोग्य मंत्रालयाने विविध जिल्ह्यांमधून नमुने गोळा केले आहेत. जिथे चहाचा वापर खूप जास्त आहे. बागलकोट, बिदर, गदग, धारवाड, हुबळी, विजयनगर, कोप्पल आणि बल्लारी या जिल्ह्यांत चहामध्ये कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे आढळून आले आहे. जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.

कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, ते सर्व काही बारकाईने पाहत असून भेसळीबाबत लोकांना माहिती दिली जात आहे. कबाब किंवा गोबी मंचुरियनवर बंदी घालत नाही, तर त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या हानिकारक पदार्थांवर आम्ही बंदी घालत आहोत. हेच चहापत्तीला ही लागू होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;