कॅन्सरचा धोका ! मंचुरियन नंतर आता पाणीपुरीवर ही येणार बंदी

कॅन्सरचा धोका ! मंचुरियन नंतर आता पाणीपुरीवर ही येणार बंदी

स्ट्रीट फूडची क्रेज लोकांमध्ये प्रचंड आहे. रस्त्यावरील पाणी-पुरी स्टॉल पाहून प्रत्येकाचे मन त्याच्याकडे जाते. बहुतांश शहरांमध्ये लोकप्रिय असलेले स्ट्रीट फूड पाणी-पुरी, कर्नाटकमध्ये मात्र बॅन होण्याच्या मार्गावर आहे. तपासादरम्यान सरकारला पाणीपुरीमध्ये कॅन्सरचा धोका निर्माण करणारे रासायनिक रंग आढळले आहेत. सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे. गरज पडली तर सरकार पाणीपुरीवरही बंदी देखील घालू शकते. यापूर्वी सरकारने मंचुरियन आणि कबाबमधील कृत्रिम रंगांवर बंदी घातली होती.

पाणीपुरीवर येणार बंदी?

कर्नाटकच्या आरोग्य विभागाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यभरातील दुकानांमधून सुमारे 250 पाणीपुरीचे नमुने गोळा करण्यात आले. ज्यामध्ये असे आढळून आले की एकूण नमुन्यांपैकी 40 नमुने अन्न सुरक्षा मानकांची पूर्तता करत नाहीत. यामध्ये ब्रिलियंट ब्लू, टारट्राझिन आणि सनसेट यलो यांसारखे कर्करोग निर्माण करणारे रासायनिक रंग आढळून आले आहेत. ही अशी रसायने आहेत, ज्यांच्या नियमित सेवनाने शरीराच्या अवयवांना मोठी हानी होऊ शकते. कर्करोगासह अनेक गंभीर आजारांचा धोका असतो.

आता ही गोष्ट समोर आल्यानंतर आरोग्य विभाग योग्य ती कारवाई करेल, असे कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी म्हटले आहे. लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी एक पाऊल पुढे टाकत दिनेश गुंडू राव यांनी विभागीय अधिकाऱ्यांना रस्त्यावरील खाद्यपदार्थ बनवताना स्वच्छता राखणे, स्वयंपाक करताना काळजी घेणे आणि रासायनिक रंग न वापरण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या महिन्यात आरोग्य मंत्री राव म्हणाले की, “कॉटन कँडी, गोबी आणि कबाबच्या निर्मितीमध्ये कृत्रिम रंग वापरण्यास बंदी असल्याने, राज्यात विकल्या जाणाऱ्या गोलगप्पाचे नमुने गोळा करून चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अनेक नमुने चाचणीत नापास झाले आहेत. ” याबाबत अधिक विश्लेषण सुरू असून, अहवाल आल्यानंतर आरोग्य विभाग योग्य ती कारवाई करेल, असे ते म्हणाले. तसेच जनतेने आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि आपल्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अन्नपदार्थांचे सेवन टाळावे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;