सकाळी सकाळी ही लक्षणे दिसली तर समजून जा ब्लड शुगर लेव्हल झालीय डाऊन

सकाळी सकाळी ही लक्षणे दिसली तर समजून जा ब्लड शुगर लेव्हल झालीय डाऊन

डायबिटीजच्या रुग्णांमध्ये केवळ शुगर लेव्हल वाढण्याचीच नव्हे तर शुगर लेव्हल कमी होण्याचीही समस्याही उद्भवू शकते. या परिस्थितीला हायपोग्लाइसीमिया म्हणतात. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असते. काही प्रकरणात ती जीवेघेणीही ठरू शकते. साधारणपणे शरीरात फास्टिंग शुगर लेव्हल 60 mg /dL ते 100mg/dL पर्यंत नॉर्मल असते. जेवणाच्या दोन तासानंतर ब्लड शुगर लेव्हल 120mg/dL ते 140mg/dLच्या दरम्यान नॉर्मल असते.

पण तिच शुगल लेव्हल 70mg/dLच्या आसपास वा खाली जाऊ लागते, तेव्हा त्याला ब्लड शुगर लेव्हलच्या वर्गवारीत गणलं जातं. हायपोग्लायसीमियाची लक्षणे ओळखून व्यक्तीला लगेच काही तरी गोड खायला दिलं पाहिजे. लगेच डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. म्हणजे आणखी परिस्थिती गंभीर होणार नाही. अनेकदा तर ही समस्या सकाळी उठल्यावरही पाहायला मिळते. त्याकडे कधीच कानाडोळा करता कामा नये. ब्लड शुगरची लेव्हल कोणत्या कारणाने कमी होते, त्याची काही कारणे आणि लक्षणे खालील प्रमाणे.

1) लो ब्लड शुगर लेव्हलची कारणं

आहारात कमतरता होणं, म्हणजे गरजेपेक्षा जास्त खाणं

शारीरिक हालचालीत अचानक वाढ होणं

औषधांची मात्रा वाढणं

एखाद्या आजारपणामुळे शुगर कमी होणं

2) सकाळी दिसणारी लक्षणे

ब्लड शुगर लेव्हल कमी होण्याची लक्षणे फक्त सकाळीच नव्हे तर कोणत्याही वेळी दिसू शकतात. त्यामुळे त्याबाबतची माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

सकाळी उठताच भयानक डोकं दुखणं

दरदरून घाम फुटणं

सकाळी उठल्यावर तोंड कोरडं पडणं

गरगरणं, चक्कर येणं

डोळ्यासमोर अंधारी येणं, दिवसभर डोळ्यावर अंधारी येणं

सकाळी उठताच घाम फुटणं

सकाळी किंवा दिवसभरात कधीही अंगाला खाज सुटणं

रात्री झोपल्यावरही सकाळी थकवा जाणवणं

कोणतंही काम केल्यावर अशक्तपणा जाणवणं

प्रचंड भूक लागणं, तहान लागणं, ही समस्या रात्रीही होऊ शकते

गुप्तांगात अचानक खाज सुटणं

शरीरावर झालेल्या जखमा लवकर भरून न निघणं

अचानक वजन कमी होणं

डायबिटीज हा एक सायलंट किलर आजार आहे. संपूर्ण शरीराला पोखरण्याचं काम हा आजार करतो. त्यामुळे त्याची लक्षणे आणि कारणे वेळीच लक्षात घेतली पाहिजे. त्यावर उपचार करण्याची गरज आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;