ब्रेन पावर वाढण्याचा सोपा उपाय, मेंदू सारख्या आकाराच्या अक्रोडचे फायदे जाणून घ्या

ब्रेन पावर वाढण्याचा सोपा उपाय, मेंदू सारख्या आकाराच्या अक्रोडचे फायदे जाणून घ्या

अक्रोड हे ड्राय फ्रूट अनेक गुणांनी संपन्न आहे. मेंदूसाठी हे सुपर फूड म्हटले जाते. हा ड्राय फ्रूटचा आकार देखील मेंदूसारखा असतो. त्यामुळे त्याचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. जे मेंदूलाही तीक्ष्ण बनवतात.  यात अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी 12 हे मेंदूसाठी आवश्यक आहे. यात इतर घटक जसे की मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि तांबे दररोज खाणे तुमच्या मेंदू आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

आरोग्यासाठी फायद्याचे असले तरी याचे सेवन मर्यादित प्रमाणातच केले पाहिजे. अक्रोड हे मानसिक आरोग्याच्या समस्यांवर औषधासारखे काम करते. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते जे मेंदूसाठी खूप फायदेशीर मानले जाते. याचे आरोग्यासाठी इतरही अनेक फायदे आहेत, चला जाणून घेऊया त्याचे फायदे.

अक्रोडमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक असतात. जे आरोग्यासाठी आवश्यक असतात. यात  व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी6, बी12, फोलेट, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असतात.

अक्रोडमध्ये उच्च अँटिऑक्सिडंट्स असतात याशिवाय चांगले फॅट्स असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगले मानले जातात. अक्रोडच्या नियमित सेवनाने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

मेंदूसारखा दिसणारा अक्रोड हे मेंदूसाठी सुपरफूड आहे. यामध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ॲसिड मेंदूसाठी फायदेशीर मानले जाते.  पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात. यामुळे मेंदूची कार्यक्षमता देखील वाढते.

अक्रोडचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. याच्या सेवनाने भूक नियंत्रित राहतो. यामुळे चयापचय वाढू शकते, ज्यामुळे कॅलरीज जलद बर्न होतात.

अक्रोडाचे सेवन हे हाडे मजबूत करण्यासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. अक्रोडमध्ये असलेले अल्फा लिनोलेनिक ॲसिड हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;