पुण्यात भाजपाच्या ‘‘दवंडी’’ची चर्चा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक सभे पुणेकरांना निमंत्रण!

लोकसभा निवडणूक रणसंग्राम : पारंपरिक पद्धतीने निमंत्रण देत लक्ष वेधले

पुण्यात भाजपाच्या ‘‘दवंडी’’ची चर्चा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक सभे पुणेकरांना निमंत्रण!

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात जोरदार प्रचार सभा होत आहेत. याच अनुषंगाने उद्या पुण्यात नरेंद्र मोदी यांची राज्यातील महायुतीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आलीय. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर होत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आता पुण्यात पारंपारिक पद्धतीने दवंडी देऊन आमंत्रण दिलं जात आहे. त्यामुळे याची सध्या जोरदार चर्चा आहे.

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात जोरदार प्रचार सभा होत आहेत. याच अनुषंगाने उद्या पुण्यात नरेंद्र मोदी यांची राज्यातील महायुतीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आलीय. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर होत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आता पुण्यात पारंपारिक पद्धतीने दवंडी देऊन आमंत्रण दिलं जात आहे. त्यामुळे याची सध्या जोरदार चर्चा आहे.

पुण्यातील लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक सभा होत आहे. या सभेला बारामती, मावळ, शिरूर सह पुणे लोकसभा मतदारसंघातील लोकांची गर्दी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच काल भाजपचे युवा नेते गिरीश खत्री मित्र परिवाराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पारंपारिक दवंडीद्वारे पुणेकरांना निमंत्रण देण्यात आले.

गिरीश खत्री मित्र परिवाराच्या वतीने नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्य नगरीचे ग्राम दैवत श्री कसबा गणपती, श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती मंदिर, तांबडी जोगेश्वरी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, ताथवडे उद्यान अश्या शहरातील विविध भागात दवंडीद्वारे पारंपरिक पद्धतीने निमंत्रण देण्यात आले. याशिवाय शहरातील विविध भागात, विविध मंदिरे, सामाजिक – ऐतिहासिक ठिकाणी आणि कलाकार कट्टा इत्यादी मोक्याच्या ठिकाणी दवंडी देत पुणेकरांना जास्तीत जास्त संख्येने मोदींच्या सभेला उपस्थित राहावे म्हणून निमंत्रित केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;