महाराष्ट्रात बंदी, गुजरातचा कांदा मात्र परदेशात; मोदी सरकारचा पक्षपाती निर्णय

महाराष्ट्रात बंदी, गुजरातचा कांदा मात्र परदेशात; मोदी सरकारचा पक्षपाती निर्णय

निर्यातबंदीमुळे महाराष्ट्रातील उन्हाळी कांदा बाजारात कवडीमोल दराने विकला जात असताना पेंद्र सरकारने मात्र गुजरातच्या पांढऱया कांद्याला निर्यातीचे दरवाजे खुले केले आहेत. हा पक्षपाती निर्णय पेंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे हा कांदा पाठवण्यासाठी तीन बंदरांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील जेएनपीए बंदराचाही समावेश आहे.  महाराष्ट्रात खरीप कांद्याचा हंगाम सुरू असतानाच पेंद्र सरकारने डिसेंबरमध्ये अचानक निर्यातबंदी जाहीर केली. त्याचा जोरदार फटका शेतकऱयांना बसला आहे. आता फक्त गुजरातच्या कांद्याला निर्यातीची परवानगी मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील कांदा चाळींमध्ये रखडपट्टी होणार आहे.

खरीप कांद्याचा हंगाम ऐन भरात असतानाच पेंद्र सरकारने डिसेंबरमध्ये अचानक निर्यातबंदी जाहीर केली. त्यामुळे 25 ते 30 रुपये किलो या दराने विकला जाणारा कांदा थेट दहा ते बारा रुपयांवर आला. आता उन्हाळी कांद्याचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र या कांद्याला अपेक्षित असा दर नाही. सरासरी कांदा नऊ ते दहा रुपये किलो या दराने विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी सरकारने निर्यातबंदी उठवणे आवश्यक होते. मात्र पेंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने फक्त गुजरातमधील पांढऱया कांद्यावरील निर्यातबंदी उठवली आहे. परिणामी देशात सर्वाधिक कांदा पिकवणारे महाराष्ट्रातील शेतकरी देशोधडीला लागणार आहेत.

पांढऱया कांद्याला दर असूनही निर्यात

खरीप हंगामातील लाल कांद्याच्या विक्रीला गती येत असतानाच पेंद्र सरकारने निर्यातबंदी केली. शेतकऱयांना हजारो कोटींचा फटका बसला आहे. त्यातच आता रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याची काढणी सुरू होऊन कांदा बाजारात येत असताना एकीकडे कांदा कवडीमोल दराने विक्री होत आहे, तर पांढऱया कांद्याला अधिक दर असतानाही त्याच्या निर्यातीस परवानगी दिली. मात्र लाल व गुलाबी कांद्याला निर्यातीची परवानगी का दिली जात नाही, असा संताप शेतकऱयांमधून व्यक्त होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

द्वेषाचं विष पेरायला जातात आणि स्वत:च त्यात अडकून पडतात, जितेंद्र आव्हाड यांचा मोदींना टोला द्वेषाचं विष पेरायला जातात आणि स्वत:च त्यात अडकून पडतात, जितेंद्र आव्हाड यांचा मोदींना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधीवर टीका करताना त्यांच्यावर अदानी व अंबानीकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला. मात्र मोदींचे हे...
मिलिंद देवरा यांच्या गळ्यात मनसेचं उपरणं; म्हणाले, मी नुकतंच…
आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी जे पी नड्डा यांना पोलिसांचे समन्स 
‘क्या कूल हैं हम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन, रितेश देशमुख याने..
दांदावर दादा नाराज, अजित पवारांसमोर असं काय म्हणाले चंद्रकांत पाटील
समाधान पाटील याचा राजकीय खूनच! खेकड्याची चाकरी करणार्‍या पोलिसांच्या भूमिकेवर संशय
ग्रामपंचायतप्रमाणे निवडणूक लढवा ! नीलेश लंके यांचे कार्यकर्त्याना आवाहन