अभिनेता अमोल कोल्हे हे स्क्रिप्ट प्रमाणे बोलतात : शिवाजीराव आढळराव पाटील

शिरुरमध्ये आजी-माजी खासदारांमध्ये प्रतिष्ठेची लढत

अभिनेता अमोल कोल्हे हे स्क्रिप्ट प्रमाणे बोलतात : शिवाजीराव आढळराव पाटील

सर्वात प्रतिष्ठेची लढत होऊ पाहत असलेल्या शिरूरच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा एकदा निवडणुकीत आमनेसामने आले आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार जोरदार सुरू केला आहे.

पिंपरी : सर्वात प्रतिष्ठेची लढत होऊ पाहत असलेल्या शिरूरच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा एकदा निवडणुकीत आमनेसामने आले आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार जोरदार सुरू केला आहे. मात्र याच दरम्यान आता दोन्ही उमेदवार एकमेकांवर जोरदार टिका टिप्पणी करतांना दिसत आहेत. यातच आढळरावांनी कोल्हेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.

काल शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरी मतदारसंघात आपला प्रचार केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना आढळरावांनी कोल्हेंवर कडाडून टिका केली. अमोल कोल्हे यांच्यामध्येच मीपणा ठासून भरला आहे. त्यामुळेच ते अजिते पवारांसह इतरांवर टिका करीत सुटले आहेत. असा पलटवार आढळरावांनी कोल्हेंवर केलाय. अमोल कोल्हे सध्या महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टिका करतांना दिसत आहेत. त्यावर आढळरावांनी प्रत्युत्तर दिलंय. 

दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की,  मी कधी थांबायचं हा माझा प्रश्न आहे. मी थांबू नये असा अमोल कोल्हेंचा आग्रह असेल तर आणखी चार निवडणूक लढवतो, असा टोला आढळराव यांनी लगावला.  अमोल कोल्हे हेच माझ्या बोलण्यावरून भावनिक झाले असतील तर मी पुन्हा लढेन. अमोल कोल्हे हे स्क्रिप्ट प्रमाणे बोलतात. त्यांना कोण लिहून देतं हे मात्र मला माहीत नाही. अमोल कोल्हेंमध्ये ‘मी’ पणा ठासून भरला आहे. अजित पवारांवर टीका, इतरांवर टीका असं त्यांचं काम सुरू आहे. हा त्यांचा ‘मी’ पणा आहे. हे निवडणूक हातातून निसटल्याचं चिन्ह आहे, असं शिवाजी आढळराव पाटील म्हणाले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नेपाळमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; चार जखमी नेपाळमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; चार जखमी
सोमवारी ईशान्य नेपाळमध्ये सोमवारी झालेल्या हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले आहेत. यालुंग री शिखरावर ही...
Andhra Pradesh Accident – हैदराबादला जाणारी बस उलटली, एकाचा मृत्यू; अनेक जखमी
बुधवारपासून उद्धव ठाकरे मराठवाडा दौर्‍यावर, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधणार; अंबादास दानवे यांची माहिती
हिवाळ्यात मुळा खाण्याचे फायदेच फायदे, जाणून घ्या मोठी माहिती
लग्नाला नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा
रत्नागिरीकरांना करोडोचा चुना लावणाऱ्या आर्जू टेकसोलची मालमत्ता जप्त होणार, प्रांताधिकाऱ्यांनी केली पाहणी
Pandharpur News – कार्तिकी वारीची सांगता; नगरपरिषदेची विशेष मोहीम, 1600 कर्मचाऱ्यांची शहर स्वच्छतेसाठी नियुक्ती