श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे आमदार महेश लांडगे यांची ‘ फराळ सेवा’

प्रतिवर्षीप्रमाणे भाविकांसाठी प्रसाद वाटप उपक्रम : श्रावण सोमवारनिमित्त सुमारे १० हजार भाविकांना लाभ

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे आमदार महेश लांडगे यांची ‘ फराळ सेवा’

श्रावण सोमवार निमित्त श्रीक्षेत्र भिमाशंकर येथे भाविकांसाठी उपवास फराळ आणि महाप्रसाद सेवा सुरू आहे. यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याचा सुमारे १० हजार भाविकांनी लाभ घेतला.

पिंपरी: श्रावण सोमवार निमित्त श्रीक्षेत्र भिमाशंकर येथे भाविकांसाठी उपवास फराळ आणि महाप्रसाद सेवा सुरू आहे. यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याचा सुमारे १० हजार भाविकांनी लाभ घेतला.

देशभरात पवित्र १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमीनिमित्त मोठी गर्दी आहे. प्रतिवर्षी आमदार लांडगे यांच्या पुढाकाराने श्रावणातील प्रत्येक सोमवारी प्रसाद वाटप आणि फराळ मोफत दिला जातो. राज्यातील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक येत असतात. 

भारतीय जनता पार्टी आमदार प्रवास योजना अंतर्गत आमदार महेश लांडगे सध्या मध्यप्रदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे श्रावणातील पहिला सोमवार श्रीक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी उपस्थित राहिले नाही. मात्र, प्रतिवर्षीप्रमाणे मंदिर परिसरात लांडगे यांच्या पुढाकाराने मोफत फराळ वाटप सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सोमवारी पहाटे ४ वाजलेपासूनच भाविकांना फराळ सेवा सुरू असून दिवसभरात हजारो भाविक याचा लाभ घेणार आहेत. मंदिर प्रशासनानेही या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले आहे. 

श्रीक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी मला कायम आत्मिक समाधान मिळते. त्यामुळे या पवित्र ठिकाणी मी कायम नतमस्तक होत असतो. पिंपरी-चिंचवडकरांसह तमाम मानवजातीला सुख-शांती लाभो, अशी प्रर्थना श्रावण सोमवारनिमित्त भगवान भीमाशंकर यांच्या चरणी करीत आहे. मोफत फराळ हा उपक्रम आम्ही प्रतिवर्षी राबवतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. त्यांना चांगला आहार, प्रसाद मिळावा, अशी आमची भूमिका आहे. 
- महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा.
Mahesh Landge-1

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;