महाडिकांची मतदारांना 5 कोटींची ऑफर, तर सिंधुदुर्गात नितेश राणेंनी सरपंचांनाच दिला दम
Loksabha election : निवडणुकीत अधिक लीड देण्यासाठी खासदार महाडिकांनी मतदारांना 5 कोटींची ऑफर दिलीये. तर सिंधुदुर्गात नितेश राणेंनी सरपंचांनाच दम दिलाय. मतदान आणि अधिक लीडसाठी खासदार महाडिक 5 कोटींची ऑफरच दिलीये. तर नितेश राणेंनी सरपंचांना सज्जड दमच दिला. 4 जूनला हिशेब होईल असा इशाराच नितेश राणेंनी दिलाय. आधी भाजपचे खासदार धनंजय महाडिकांची ऑफर काय ती ऐका. कोल्हापूरचे शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिकांच्या प्रचारासाठी महाडिकांनी चंदगड तालुक्याच्या नेसरी गावात सभा घेतली. कागल आणि चंदगड तालुक्यापैकी ज्या तालुक्यात अधिक लीड मिळेल त्या तालुक्याला 5 कोटींचा अधिक निधी दिला जाईल, अशी शर्यतच खासदारांनी लावली.
चंदगड तालुक्यात महाडिक 2 तालुक्यात शर्यत लावून ऑफर देत होते. तर नितेश राणेंनी सिंधुदुर्गाताल्या भाजपच्या मेळाव्यातून संरपंचांनाच दम भरलाय. हवं तसं लीड मिळालं नाही तर, 4 जूनला हिशेब घेणार आणि नंतर निधीची तक्रार करायची नाही, असं कडक इशारा नितेश राणेंनी दिला.
मतदारांना जाहीर आमिष आणि धमक्या दिल्या जात आहेत. निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता फक्त विरोधकांसाठीच आहे का ?, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मात्र धनंजय महाडिक आणि नितेश राणेंच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. विकासासाठी वक्तव्यं केल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत. पैशांची घोषणा…मतदारांना दम किंवा धमक्या देणारी वक्तव्य टाळावीत असं निवडून आयोगाच्या आचारसंहितेत आहे. मात्र, खासदार आणि आमदारच 5-5 कोटींच्या ऑफर्स आणि दम देत आहेत.
महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यापैकी कोल्हापूर मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. तर सिंधुदुर्गात देखील ७ मे रोजीच मतदान होणार आहे. निवडणुकीच्या आधीच सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आमदारांनाही जबाबदारी देण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List