पिंपळे सौदागर मधील गोविंद–यशदा चौक वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी शत्रुघ्न काटे यांचा पुढाकार!
आठवडे बाजार लिनियर गार्डन शेजारी स्थलांतरित: स्थानिक नागरिकांना आवाहन
On
पिंपळे सौदागर मधील गोविंद – यशदा चौक रोडवरील शेतकरी आठवडे बाजार हा गोविंद यशदा चौक लिनियर गार्डन लगतच्या सर्विस रोडवर स्थलांतरित करण्यात आलेला आहे. आठवडे बाजारमुळे नागरिकांना होणारी वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेत “माजी नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे” यांनी हा निर्णय घेतला आहे.
पिंपरी : पिंपळे सौदागर मधील गोविंद – यशदा चौक रोडवरील शेतकरी आठवडे बाजार हा गोविंद यशदा चौक लिनियर गार्डन लगतच्या सर्विस रोडवर स्थलांतरित करण्यात आलेला आहे. आठवडे बाजारमुळे नागरिकांना होणारी वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेत “माजी नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे” यांनी हा निर्णय घेतला आहे.
यापुढे जे कोणी विक्रेता फुटपाथवर आपली गाडी लावेल त्यावर पालिका अतिक्रमण विभाग मार्फत सक्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे. पिंपळे सौदागरमध्ये सर्वात प्रथम लोकांना थेट शेती माल आणि भाज्या मिळाव्यात ह्या उद्देशाने माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी शेतकरी आठवडी बाजाराची सुरुवात केली. त्यानंतर ह्याच परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक आठवडी बाजार सुरू झाले. सध्या पिंपळे सौदागर मध्ये ट्रॅफिकचा प्रश्न सर्वच ठिकाणी भेडसावत आहे. पिंपळे सौदागर परिसरात आयटीयन्स प्रमाण जास्त असल्याने मुख्यतः शनिवार आणि रविवारी नागरिक बाजारहाट करण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतात. ज्याच्यामुळे रस्त्यावर रहदारीचे प्रमाण वाढते. यावर उपाय काढणे गरजेचे होते.
तसेच कठोर निर्णय घेणे अत्यावश्यक आहे म्हणून शत्रुघ्न काटे यांनी याची सुरुवात स्वतः पासून केली असून त्यांनी स्वतःहून सुरू केलेल्या शेतकरी आठवडे बाजार मुख्य रस्त्यापासून बाजूला घेऊन गोविंद यशदा चौकात होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आणि ह्यामुळे नक्कीच सर्व सामान्य नागरिकांना येथील प्रवास सोईस्कर होणार आहे. परिसरात सुरू असलेले इतर शेतकरी आठवडे बाजाराचे आयोजन करणाऱ्या प्रमुखांनी सुध्दा जर नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या प्रमाणे पुढाकार घेत आपापले आठवडे बाजार जर मुख्य रहदारी असलेल्या ठिकाणापासून दुसरी कडे स्थलांतरित केले तर नक्कीच परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर मात करता येईल. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी उचललेल्या या पाऊलमुळे गोविंद चौक ते काटे पेट्रोल पंप या रस्तावर वाहतूक कोंडी राहणार नाही तसेच नागरिकांनी आपली वाहने पार्किंगला लावून सहकार्य करावे व आठवडे बाजाराचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List