ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत आता व्हिडीओ वॉर, ठाकरे गटाला मनसेचं सडेतोड उत्तर

ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत आता व्हिडीओ वॉर, ठाकरे गटाला मनसेचं सडेतोड उत्तर

ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत आता व्हिडीओ वॉर सुरु झाला आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यावरुन केमिकल लोचा, अशा टीकेचा उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ ठाकरे गटानं ट्विट केला होता. त्याच व्हिडीओला मनसेनंही व्हिडीओनं प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांनी मोदींना साथ देताना महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत व्हिडीओ वॉर सुरु झालाय.

ठाकरे गटाला संदीप देशपांडे यांचं उत्तर

राज ठाकरेंचा केमिकल लोच्या झालाय, अशी टीका करणारा उद्धव ठाकरेंचा व्हिडीओ ठाकरे गटानं ट्विट केल्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडेंनीही चला आरश्यात बघून म्हणत उद्धव ठाकरेंच्या बदलेल्या भूमिकांचे व्हिडीओ ट्विट केले आहेत. अर्थात सुरुवात, ठाकरे गटानंच केली होती. 2 वर्षांआधीच्या दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंना मुन्नाभाई म्हणत, केमिकल लोचा झाल्याची टीका राज ठाकरेंवर केली होती. तोच व्हिडीओ ठाकरेंच्या शिवसेनेनं ट्विट केला आणि राज ठाकरेंना बिनशर्त पाठिंब्याच्या मुद्द्यावरुन डिवचलं.

या व्हिडीओला मनसेकडून संदीप देशपांडे यांनी ही 5-5 व्हिडीओनं उत्तर दिलंय. एक पोस्टर ट्विट करुन ठाकरेंच्या भूमिकांवरुनही निशाणा साधला.

2009 भाजपचे चांगले…काँग्रेस-राष्ट्रवादी वाईट
2014 भाजप वाईट म्हणून युती तोडून वेगळे लढले आणि निवडणुकीनंतर परत भाजप चांगले
2019 विधानसभा लढताना भाजप चांगले, काँग्रेस -राष्ट्रवादी वाईट आणि निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी चांगले, भाजप वाईट
2022 उद्धव ठाकरेंना पाठींबा देणारे शिवसैनिक चांगले, शिंदेंना पाठींबा देणार शिवसैनिक वाईट

उद्धव ठाकरे यांचे व्हिडिओ ट्विट

तिसरा व्हिडीओ पुन्हा शरद पवारांवरचाच आहे. त्यावेळी सर्जिकल स्ट्राईकवरुन सवाल करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ठाकरे पवारांवर बसरले होते. चौथा व्हिडीओ आहे, उद्धव ठाकरेंचा सोनिया गांधींवरचा…या व्हिडीओत सोनियांना ठाकरे इटालियन बाई म्हणत आहेत.

पाचवा व्हिडीओ आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरचा…2019 मध्ये मुंबईतल्या सभेत सर्व 6 खासदार मोदींसाठी दिल्लीत पाठवणार, असं वचन मुंबईकरांकडून उद्धव ठाकरेंनी घेतलं होतं.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या साडे 4 वर्षात, भूमिकांमध्ये थ्री सिक्स्टी ड्रिगीत बदल झालाय. त्यामुळं राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करताच तुटून पडणाऱ्या ठाकरे गटालाही त्यांच्याच पक्षप्रमुखांचे जुने व्हिडीओ दाखवून मनसेनं सडेतोड उत्तर दिलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;