महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

राष्ट्रीय पुरस्काराचे डॉ कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते शानदार वितरण 

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

अल्पसंख्य समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी विद्यापीठ स्थापन करुन शैक्षणिक योगदान दिल्याबद्दल डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांना डॉ कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते, माजी आमदार मोहन जोशी यांच्या उपस्थितीत रविवारी राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

पुणे : अल्पसंख्य समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी विद्यापीठ स्थापन करुन शैक्षणिक योगदान दिल्याबद्दल डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांना डॉ कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते, माजी आमदार मोहन जोशी यांच्या उपस्थितीत रविवारी राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात ला.   शैक्षणिक,सामाजिक,सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ या वृत्त संस्थे मार्फत करण्यात आला.सन्मानचिन्ह,मानपत्र, फुले पगडी असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
 
महाराष्ट्राच्या  सर्व जिल्ह्यातील,समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचाही सत्कार या देशपातळीवरील  कार्यक्रमात करण्यात  आला.’प्रेस मीडिया लाईव्ह’ संस्थेच्या वतीने हा पुरस्कार सोहळा २० ऑगस्ट २०२३ रोजी , दुपारी १२ वाजता,आझम कॅम्पस येथे  झाला.’प्रेस मीडिया लाईव्ह’ वृत्त संस्थेचे प्रमुख  मेहबूब सर्जेखान यांनी स्वागत केले
 
यावेळी बोलताना डॉ कुमार सप्तर्षी म्हणाले,’ भारत हे सर्व समावेशक राष्ट्र आहे, त्याचे स्वरूप बदलण्याचे काम सध्या सुरू आहे. भारताच्या सर्वसमावेशकता आणि सामंजस्याला संपविण्याचे कारस्थान यशस्वी होऊ देता कामा नये. ही निवडणूक लोकशाहीची शेवटची निवडणूक ठरू शकते, त्यामुळे फॅसिस्ट सरकार पुन्हा येवू देता कामा नये ‘.
 
‘डॉ .पी ए इनामदार यांनी मौलाना आझाद यांच्या विचारांवर कार्य करून पुण्याच्या शैक्षणिक, सामाजिक विश्वात अतुलनीय योगदान दिले आहे. अल्पसंख्य समाजाला शिक्षणाची दिशा देण्याचे कार्य त्यांनी निर्धार पूर्वक केले.ते माझ्यासाठी बंधुवत आहेत.  मुस्लिम मुलींना शिकविण्याचे त्यांचे काम इतिहासाला कलाटणी देणारे आहे ‘, असेही उद्गार डॉ कुमार सप्तर्षी यांनी काढले
 
सत्काराला उत्तर देताना डॉ पी ए इनामदार म्हणाले,’ एक कर्तव्य म्हणुन आम्ही दांपत्याने योगदान दिले आहे. जातीवाद, प्रांत वाद, धर्म वाद आमच्या कॅम्पस मध्ये आम्ही मानत नाहीं. आम्ही हे योगदान देवू शकलो याचे श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आणि त्यांनी लिहिलेल्या राज्य घटनेला आहे. आपण सर्वांनी भारतीय म्हणुन कार्यरत राहिले पाहिजे ‘.
 
माजी आमदार मोहन जोशी म्हणाले,’ डॉ पी ए इनामदार यांनी पुण्यात सर्व समाजाला सोबत घेवून एकात्मतेचे उदाहरण समोर ठेवले. इनामदार दांपत्याने अल्पसंख्य, बहुजन समाजाला प्रगती पथावर नेण्याचे काम केले. माजी आमदार मोहन जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होतें. एड.अयुब शेख, आबेदा इनामदार, एस ए इनामदार, शाहीद इनामदार, बबलू शेख, मशकुर शेख, असिफ शेख, अजित दरेकर,वाहिद बियाबानी उपस्थीत होते. हसीना इनामदार, इकबाल अन्सारी, मोहसीन शेख, हाजी सय्यद, शबीर मुजाही द, मशकुर शेख, मुन्ना शेख, नाझिम शेख, असिफ अयुब शेख, समीर शेख तसेच राज्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. फिरोज मुल्ला यांनी सूत्र संचालन केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;