भरसभेत हातजोडले; राज ठाकरे मनसैनिकांना म्हणाले, कृपा करून…

भरसभेत हातजोडले; राज ठाकरे मनसैनिकांना म्हणाले, कृपा करून…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या मेळाव्यातून आपले पत्ते ओपन केले आहेत. राज ठाकरे यांनी केवळ मोदीसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. आपल्या देशाला खंबीर नेत्याची गरज असल्यानेच हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच मनसैनिकांना लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मला जी भूमिका मांडायची ती मांडली आहे. आता यावरही कुणी पकपक केली तर मग माझी दारं, खिडक्या मी उघडणार आहे, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला.

शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. ही भूमिका मांडत असतानाच त्यांनी मनसैनिक आणि राज्यातील मतदारांना हातजोडून कळकळीचं आवाहनही केलं. या महाराष्ट्रातून पुढे जाताना आपल्याला मार्ग काढायचा आहे. आपल्या महाराष्ट्र सैनिकांवर माझा विश्वास आहे. आपण राज्याला योग्य मार्ग दाखवू. माझी महाराष्ट्राकडून अपेक्षा आहे. मतदारांकडूनही अपेक्षा आहे. कृपा करून (हात जोडून) व्याभिचाराला राज मान्यता देऊ नका. ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे. त्याला राजमान्यता मिळाली तर पुढचे दिवस भीषण आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.

तर माझं तोंड आहेच…

आजच्या परिस्थितीत मी पाहतो. तेव्हा पुढच्या 50 वर्षाचा विचार करायचा असतो. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. म्हटलं वाटाघाटीत मला पाडू नका. मी तुम्हाला आज सांगतो. राज्यसभा नको आणि विधान परिषद नको. पण या देशाला चांगल्या नेत्याची गरज आहे. त्याच्याकडून अपेक्षा आहे. त्या पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरेंचं तोंड आहेच. मला काही अपेक्षा नाही. मनसे भाजप, शिवसेना आणि एनसीपीला फक्त मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. हे मी जाहीर करतो, असं राज ठाकरे म्हणाले.

तर दारं, खिडक्या…

सर्व मनसैनिकांना एकच सांगतो. विधानसभेच्या कामाला लागा. जोरात विधानसभेच्या तयारीला लागा. पुढच्या गोष्टी पुढे. मी लवकर तुम्हाला भेटायला येत आहे. मला मांडायचं असेल तर मांडेल. कुणाची पकपक झाली. तर उद्या दारं खिडक्या उघडणार आहे, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;