Loksabha Election 2024 लढवण्यासाठी 52 एकर जमीन, करोडोंची प्रॉपर्टी विकणारे शिवाजीराव जाधव कोण?

Loksabha Election 2024 लढवण्यासाठी 52 एकर जमीन, करोडोंची प्रॉपर्टी विकणारे शिवाजीराव जाधव कोण?

राजकारणात पैसा आहे, अस म्हणतात. म्हणूनच दर पाच वर्षांनी काही राजकीय नेत्यांची संपत्ती आपल्याला दुप्पट झालेली दिसते. पण या देशात असे सुद्धा काही नेते आहेत, जे पदरची संपत्ती विकून निवडणूक लढवतात. राजकारण, समाजकरणात पद, प्रतिष्ठा या महत्त्वकांक्षेतून निवडणूक लढवली जाते. पण विजय मिळाला नाही, तर तो उमेदवार कर्जबाजारी होतो, मोठ आर्थिक नुकसान होतं. याची सुद्धा अनेक उदहारण आपण पाहिली आहेत. अगदी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीतही विजय मिळवण्यासाठी काही उमेदवार वाट्टेल तेवढा पैसा खर्च करतात. त्यातून अनेक पदरी निराशाच येते. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ते ही अपक्ष म्हणून हिम्मत लागते. कारण लोकसभेचा मतदारसंघ मोठा असतो. लोकसभेला अपक्ष उमेदवाराच्या विजयाची शक्यता तशी कमीच असते. पण इच्छेला पर्याय नसतो.

आता हिगोंलीतून भाजपाचे शिवाजीराव जाधव निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. राजकारणासाठी त्यांनी आतापर्यंत 52 एकर जमीन, करोडोंची प्रॉपर्टी विकली आहे. एडवोकेट शिवाजीराव जाधव यांची गिरीश महाजन यांनी भेट घेतली. त्यानतंरही ते निवडणूक लढवण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत. शिवाजीराव जाधव हिंगोली भाजपाचे जिल्हाध्यक्ष होते. निवडणूक हरलो, तर पुन्हा दिल्लीत जाऊन वकिली करेन असं जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. महायुतीमध्ये हिंगोलीचा जागा शिवसेनेकडे गेली आहे. हिंगोलीमधून बाबूराव कदम महायुतीचे उमेदवार आहेत.

कुठली, किती संपत्ती विकली?

शिवाजीराव जाधव म्हणाले की, “मागच्या 10-12 वर्षांपासून मी हिंगोली विधानसभा, वसमत विधानसभा परिसरात काम करतोय. 80 टक्के समाजकरण आणि 20 टक्के राजकारण या सूत्राने काम केलय. दिल्लीतली मोठी प्रॅक्टिस सोडून सोडून इथे आलो” “2014 ला पहिली निवडणूक लढवताना प्रतिज्ञापत्र सादर केलं. 2024 ला पुन्हा प्रतिज्ञापत्र सादर केलं, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की वसमंतची प्रॉपर्टी विकली, 50 एकर बागायती जमीन विकली. नांदेड, पुणे, नोएडा, दिल्ली येथील करोडो रुपयांची संपत्ती विकली. माझ्या नावावर आता फक्त वडिलोपार्जित 66 गुंठे जमीन आहे. मला सीएम एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे” असं शिवाजीराव जाधव म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;