अखेर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर, कुणाला किती जागा?, मोठा भाऊ कोण?; संपूर्ण यादी पाहा
महाविकास आघाडीचं अखेर जागा वाटप जाहीर झालं. महाविकास आघाडीत ठाकरे गट 21, शरद पवार गट 10 आणि काँग्रेस 17 जागांवर लढणार आहे. यात भिवंडीची जागा शरद पवार गटच लढणार आहे. तर सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आली आहे. काँग्रेस पहिल्यांदाच सांगलीची जागा लढणार नाही. आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत हे जागा वाटप करण्यात आलं.
महाविकास आघाडीची शिवालयात संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, शेकापचे नेते जयंत पाटील, संजय राऊत आदी उपस्थित होते.
महाआघाडी लढण्यास तयार
शेकाप, आप, समाजवादी पार्टी, माकप, समाजवादी गणराज्य पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आहे. आंबेडकरी विचाराच्या अनेक संघटनाही आमच्यासोबत आल्या आहेत. त्या सर्वांची आघाडी झाली आहे. अनेकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. काही लोक आले. काही सोबत आले नाही. पण आम्ही आघाडी तयार केली आहे. आता आम्ही सर्व एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.
काँग्रेसच्या जागा (17)
नंदूरबार, धुळे अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई नॉर्थ सेंटर, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि नॉर्थ मुंबई.
राष्ट्रवादी (10)
बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, माढा, नगर दक्षिण, बीड
शिवसेना (21)
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, धाराशीव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, सांगली, यवतमाळ-वाशिम, दक्षिण मध्य मुंबई,
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List