ओवैसी यांनी उट्टं काढलं, अमरावतीत मोठी खेळी, प्रकाश आंबेडकर यांची पहिल्यांदाच कोंडी?

ओवैसी यांनी उट्टं काढलं, अमरावतीत मोठी खेळी, प्रकाश आंबेडकर यांची पहिल्यांदाच कोंडी?

महाराष्ट्रातील हायहोल्टेज मतदारसंघात अमरावती एक आहे. या मतदारसंघात नवनीत राणा यांना विजयासाठी मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी येथे शड्डू ठोकले आहे. तर प्रहारचे बच्चू कडू यांनी पण बंडाचा पवित्र घेतला आहे. एवढंच कमी की काय, तर प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी पण अमरावती मतदारसंघावर दावा ठोकला आहे. यामध्ये एमआयएमने मोठे कार्ड खेळले आहे. पक्ष प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या आंबेडकरांना विजयी करण्याचे आवाहन त्यांच्या कार्यकर्त्यांना केले आहे.

सोशल मीडियावर आवाहन

  1. ओवेसी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आनंदराज आंबेडकर यांनी यापूर्वीच लोकसभेसाठी या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी एआयएमआयएमला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिसाद दिला. त्यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला.
  2. ओवेसी यांनी याविषयी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट लिहिली. ” मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना एआयएमआयएमचा पाठिंबा जाहीर करताना मोठा आनंद होत आहे. ते अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना त्यांना विजयी करण्याचे आवाहन करतो.”, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

हे उमेदवार मैदानात

अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने बलवंत वानखेडे यांना मैदानात उतरवले आहे. महायुतीत सक्रिय असलेल्या प्रहारने विरोधात दंड थोपटले आणि दिनेश बूब यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने प्राजक्ता पिल्लेवान यांच्या नावाची घोषणा केलेली आहे. तर स्वतः आनंदराज आंबेडकर मैदानात उतरलेले आहेत.

इम्तियाज जलील यांची घेतली भेट

आनंदराज आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगरचे खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची नुकतीच भेट घेतली. अमरावती मतदारसंघात एमआयएमने त्यांना पाठिंबा द्यावा यासाठी त्यांनी आवाहन केले होते. 2 एप्रिल रोजी जलील यांच्या घरी जाऊन आंबेडकर यांनी निवडणुकीविषयी चर्चा केली होती. अमरावतीसह बुलढाणा, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;