ठाकरे गट की काँग्रेस? सांगलीत नेमका कोणाचा उमेदवार लढणार

ठाकरे गट की काँग्रेस? सांगलीत नेमका कोणाचा उमेदवार लढणार

Sangli Loksabha election : महाविकास आघाडीचा सांगलीत नेमका कोणाचा उमेदवार असेल हे, उद्या स्पष्ट होणार आहे. उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आहे. ठाकरे गटानं चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली असली तरी काँग्रेसचा दावा कायम आहे. त्यामुळं ठाकरेंचाच उमेदवार राहणार की काँग्रेसच्या विशाल पाटलांची लॉटरी लागणार ?  याबाबत प्रश्नचिन्ह आहे. सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद सुरु असतानाच निर्णयाची गुढी उभारण्याचा इशारा काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटलांनी दिलाय. मंगळवारी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आहे. याच पत्रकार परिषदेत जागा वाटपाची अधिकृत घोषणेसह सांगली तसंच भिवंडीच्या जागेवरुनही घोषणा होईल.

कोणाला मिळणार उमेदवारी?

सांगलीत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिलीये. मात्र इथं काँग्रेसचा दावा आहे. काँग्रेसकडून सांगलीत विशाल पाटील इच्छुक उमेदवार आहे. जे सांगलीत झालं तसंच भिवंडीत शरद पवार गटासोबत काँग्रेसचा तिढा आहे. भिवंडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं बाळ्या मामा म्हात्रेंना उमेदवारी दिलीय. तर काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे इच्छुक आहेत.

काँग्रेसचा जागेवर दावा कायम

पहिल्या 2 टप्प्यासाठी उमेदवारांची घोषणा केल्यानंतर, पहिल्यांदाच महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होत आहेत. मात्र या पत्रकार परिषदेआधी, ठाकरे गटाकडून संजय राऊत सांगलीच्या जागेवरुन वाद मिटल्याचं सांगत आहेत. तर सांगलीच्या जागेची घोषणा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणार असल्याचं सांगून पुन्हा काँग्रेसकडेच जागा येईल असा विश्वास व्यक्त करत आहेत.

राऊतांचा काँग्रेसवर नेत्यांवर हल्लाबोल

सांगलीत संजय राऊतांनी नुकताच 2 दिवसांचा दौरा केलाय. या दौऱ्यातून राऊतांनी काँग्रेसच्याच नेत्यांवर हल्लाबोल केला. नौटंकीही काढली आणि उमेदवार बदलणार नाही असंही ठणकावलं. पण काँग्रेसही माघार घेण्यास तयार नाही. विश्वजित कदमांनी दिल्लीत काँग्रेस हायकमांडचीही भेट घेतली आणि सकारात्मक निर्णयाचा विश्वासही व्यक्त केला. तर निर्णय होण्याआधीच सांगलीत संजय राऊत 2 दिवस का आले ? असा सवाल विशाल पाटील करत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;