10 रुपयांत मिळेल चहा-समोसा; लोकसभेसाठी उमेदवाराला करता येईल इतके लाख खर्च

10 रुपयांत मिळेल चहा-समोसा; लोकसभेसाठी उमेदवाराला करता येईल इतके लाख खर्च

Lok Sabha Election 2024 च्या प्रचाराचे रणशिंग फुंकले गेले आहे. पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात प्रचाराला धार आली आहे. प्रचारा कार्यातील खर्चासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) वस्तूंच्या किंमतींची यादी आणि उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा जाहीर केली आहे. यामध्ये चहा, कचोरी, समोशासह जवळपास 200 वस्तूंचा सहभाग आहे. त्यातंर्गत राजकीय पक्षांना खर्च करताना लक्ष ठेवावे लागेल. त्यानुसार चहा,समोसा 10 रुपये तर कॉफी आणि शीतपेयासाठी 15 रुपये खर्चास मंजूरी देण्यात आली आहे. तर 100 रुपयांत शाकाहारी थाळी, 180 रुपयांत मांसाहारी थाळीचा खर्च करता येईल. इतर अनेक खर्चाची यादीच निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. निवडणूक प्रचारात खर्च होणारा ही रक्कम निवडणूक खर्चात जोडण्यात येईल.

खर्चाची मर्यादा इतके लाख

  • एका लोकसभा मतदारसंघात उमेदवाराला जास्तीत जास्त 95 लाख रुपयांचा खर्च करता येईल. या रक्कमेत इतर वस्तूंमध्ये मायक्रोफोन, लाऊडस्पीकर, एम्प्लीफायर, वाहन, बॅनर, खूर्ची, सोफा सेट, दिवा, पंखे, चटई, फुलदाणी, फुलाचे हार, तंबू, पाणी, जनरेटर सेट, ड्रोन कॅमेरा यांचा समावेश करण्यात आला आहे.
  • जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून नाष्टा, स्नॅक्स, शाकाहारी आणि मांसाहारी थाळीसाठीचे दर निश्चित करण्यात आले आहे. त्याची एक यादीच जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, पिण्याच्या पाण्याची बॉटल, बिस्किटच्या किंमती MRP आधारीत असतील. याशिवाय कचोरी 15 रुपये, सँडविच 25 रुपये आणि जिलेबी 90 रुपये प्रति किलोवर मिळेल. निवडणूक आयोगाने 200 वस्तूंची एक यादीच जाहीर केली आहे.

निवडणूक अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक

उमेदवाराला कोणताही कार्यक्रम घेण्यापूर्वी स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. निवडणूक विभाग विविध कार्यक्रम, जाहीर सभा यांची रेकॉर्डिंग आणि खर्चाचे विश्लेषण करणार आहे. त्यासाठी एक टीम पाठवते. ही टीम उमेदवार खर्चाची मर्यादा पालन करत आहेत की नाही यावर लक्ष ठेवते.

वाहनांवरील खर्चाची मर्यादा निश्चित

प्रचारात वाहन वापरासाठीचे दर निश्चित करण्यात आले आहे. दुचाकीचे भाडे रोजी 300 रुपयांचा खर्च, तर ई-रिक्शासाठी 600 रुपयांचे किराया हा दर आहे. होंडा सिटी आणि टाटा सफारी सारख्या एसयुव्हीचे भाडे 3,000 रुपये प्रति दिवस निश्चित करण्यात आले आहे. टोयोटा इनोव्हा, फॉर्च्युनर सारख्या वाहनांसाठीचे भाडे 3,000 रुपये असेल. तर पेजेरो वाहनासाठी प्रति दिवस 3,200 रुपयांच्या खर्चाची मर्यादा निश्चित आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;