Maharashtra Political News LIVE : समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरु आहे. आता राज ठाकरे यांच्या मनसेकडूनही तयारी सुरु झाली आहे. कल्याण लोकसभेसाठी मनसेकडून आज शक्ती प्रदर्शन होणार आहे. डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये मनसेतर्फे बाईक रॅली काढली जाणार आहे. अधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी एका व्यावसायिकाकडे २० लाख रुपयांची मागणी करून आठ लाख रुपये स्वीकारल्याप्रकरणी पालिकेच्या दोन अभियंत्यांसह एका व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. ठाण्यातही राज्य विमा निगम कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी धीरेंद्र सतेंद्र मिश्रा आणि सुरक्षा अधिकारी रवीकुमार तेलवाडे यांना ५० हजारांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे प्रवाशांची गर्दी वाढते. यामुळे मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोच्चुवेलीदरम्यान २४ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List