महायुतीत पाच जागांचा तिढा अजून कायम, शिरसाट यांची कबुली?; कोणत्या आहेत जागा?

महायुतीत पाच जागांचा तिढा अजून कायम, शिरसाट यांची कबुली?; कोणत्या आहेत जागा?

महायुतीतील जागा वाटपांचा पेच अजून सुटलेला नाही. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीच याबाबतची कबुली दिली आहे. ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक आणि संभाजीनगर या महत्त्वाच्या पाच जागांबाबत आम्ही आग्रही आहोत. आज उद्या या जागांचा तिढा सुटेल, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या पाचही जागा शिवसेनेच्याच आहेत. या जागांवर शिवसेनेचे खासदार आहेत, असं असतानाही भाजप आणि अजितदादा गटाने या जागांवर दावा सांगितल्याने शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षावर बैठक बोलावली होती. या बैठकीला संजय शिरसाट उपस्थित होते. या बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधताना संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली. नाशिक, संभाजीनगर, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग आदी जागांवर आम्ही आग्रही आहोत. यावर आज किंवा उद्या तोडगा निघेल, असं संजय शिरसाट म्हणाले. शिवसेनेच्या एकदोन मतदारसंघाबाबत तडजोड झाली आहे. पण इतर मतदारसंघावरही लक्ष केंद्रीत केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

निवडणूक अटीतटीची

इतर पक्षाचे लोकं शिवसेनेच्या मतदारसंघावर दावा करत आहेत. त्या मतदारसंघाबाबत आजच्या बैठकीत आमदारांनी आग्रही भूमिका मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत, ते सांगतील तो आदेश आम्ही पाळू. आजच्या बैठकीत तिन्ही पक्षांनी मिळून काम करण्यावर सखोल चर्चा केली. आपला उमेदवार असेल तर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपल्यासोबत कसे असले पाहिजे, यावर चर्चा झाली. एकमेकांच्या मतदारसंघात एकमेकांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला. अटीतटीची निवडणूक आहे. मोदींना पंतप्रधान बनवायचं आहे. त्यामुळे एकदिलाने सर्वच मतदारसंघात काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

एकमेकांविरोधात बोलू नका

संपर्कात अडचणी येत असेल तर एक डिव्हीजन तयार केली आहे. तिन्ही पक्षाचे एक एक प्रतिनिधी या डिव्हिजनमध्ये असतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कसा संपर्क साधायचा यावरही चर्चा करण्यात आली, असं त्यांनी सांगितलं. आघाडी आणि महायुतीच्या राजकारणात थोडी बहुत कुरबुरी असते. काही ठिकाणी कार्यकर्ते स्लो जात असतात. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या बैठकीत आमदारांच्या सर्व तक्रारी मांडणार असल्याचं सांगितलं. सध्या एकमेकांविरोधात कुणी बोलू नये अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;