Yogi Adityanath : ‘त्यांचं आम्ही राम नाम सत्य सुद्धा करतो’, योगी आदित्यनाथ यांचं मोठ विधान
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा लोकसभा निवडणूक 2024 साठी जोरदार प्रचार सुरु आहे. भाजपा उमेदवारांच्या विजयासाठी ते जनतेला आवाहन करतायत. प्रचारामध्ये ते आपल्या सरकारने केलेल्या कामांची उदाहरण देतायत. प्रशासन किती मजबूत आहे? ते सांगतात. ते अलीगढमध्ये बोलत होते. त्यावेळी सीएम योगी आदित्यनाथ म्हणाले की, “कोणी विचार केलेला की, मुलगी आणि व्यापारी रात्री सुरक्षित बाहेर पडू शकतात. आम्ही फक्त रामच आणत नाही, तर मुलगी आणि व्यापारी यांच्या सुरक्षेला जो धोका बनतो, त्याच राम नाम सत्य सुद्धा करतो” “जर एखादा व्यक्ती समाजाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असेल, तर त्याच राम नाम सत्य निश्चित आहे. 10 वर्षापूर्वी जे स्वप्न होतं, ते आता प्रत्यक्षात आलय. तुमच्या एका मतामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकलं” असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
“एक मत चुकीच्या लोकांना गेल्यामुळे देश भ्रष्टाचार, अराजकता आणि उपद्रव यामध्ये बुडून जायचा. कर्फ्यू लागायचा. गुंडगिरी वाढायची. मत आपलं, त्यामुळे पापामध्ये आपण सुद्धा भागीदार असणार. जेव्हा चुकीच्या लोकांना तुम्ही मत देणार, तेव्हा असं होणार” असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
मोदींच्या गॅरेंटीने तुमच भविष्य बनेल
सीएम योगी म्हणाले की, “म्हणून म्हणतोय की, तुम्ही तुमच एक मत पीएम मोदींना दिलं, मोदींच्या नावावर दिलं, तर मोदींच्या गॅरेंटीने तुमच भविष्य बनेल. तुम्ही पाहा वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर हायवे, रेल्वे, एअरपोर्टच निर्माण कार्य सुरु आहे. डिफेंस कॉरिडोर, गुंतवणूक, मेडिकल कॉलेज, विश्वविद्यालय, फॅक्टरीच निर्माण कार्य चालू आहे”
योगी आदित्यनाथ यांची ही कितवी टर्म?
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाची योगी आदित्यनाथ यांची ही दुसरी टर्म आहे. देशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशमध्ये आहेत. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाला उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा जिंकायच्या आहेत. उत्तर प्रदेशातून लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाचा केंद्रात सत्ता बनवण्याचा मार्ग सुकर होतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List