Maharashtra Political News LIVE : कसा झाला अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश?
पक्षात बंडखोरी होऊ शकते ही भीती लक्षात घेऊन बंडखोरी करु नका, युती धर्म पाळा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या पाच विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बंडखोरी होण्याची भीती आहे. तसच काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरचा दौरा केला. बारामतील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचा हा दौरा महत्त्वाचा होता. कारण इंदापूरमधून सुनेत्रा पवार यांच्यासाठी हर्षवर्धन पाटील यांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात महायुतीत धुसफूस कायम आहे. शुक्रवारी सायंकाळी भाजप कार्यकर्त्यांनी कल्याण पूर्व भागात बैठक घेऊन कल्याण लोकसभेसाठी दुसरा उमेदवार द्यावा, श्रीकांत शिंदे यांचं काम करणार नाही, असा निर्णय घेतला आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List