कल्याण लोकसभा मतदार संघात महायुतीत धुसफूस, मतदार संघ भाजपला न दिल्यास काम न करण्याचा इशारा

कल्याण लोकसभा मतदार संघात महायुतीत धुसफूस, मतदार संघ भाजपला न दिल्यास काम न करण्याचा इशारा

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या महायुतीत अजूनही समेट होत नाही. चर्चांवर चर्चा सुरु आहे. कल्याण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि सिंधुदुर्गचा निर्णय अद्यापही जाहीर झालेले नाही. एकीकडे 400 चा नारा देत महायुतीतील नेते जोमाने कामाला लागलेले दिसून येत आहे. तर दुसरीकडे जागा वाटपावरून नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्येही युतीत अंतर्गत वाद सुरू आहे. यात मुख्यमंत्री यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभेचा तिढा अजूनही सुटत नाही. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकारानंतर भाजप-शिवसेनेत अजूनही वाद सुरुच आहे.

बैठकीत घेतला निर्णय

आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती केलेला आरोप व शिवसेना शिंदे गट कार्यकर्ता आणि भाजप कार्यकर्त्यांचा वादानंतर कल्याण लोकसभेत विरुद्ध गणपत गायकवाड भाजप कार्यकर्ते असा संघर्ष पेटला आहे. कल्याण लोकसभेत भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे पिता-पुत्रांना विरोध करत निवडणुकीत सहकार्य करणार असल्याचं निर्धार केला आहे. यासाठीच शुक्रवारी सायंकाळी भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा कल्याण पूर्व भागात बैठक घेऊन कल्याण लोकसभेसाठी दुसरा उमेदवार द्यावा, श्रीकांत शिंदे यांचा काम करणार नाही, असा निर्णय या बैठकीत घेतला.

शिवसेना शिंदे गट आक्रमक

भाजप कार्यकर्ते यांच्या या बैठकीनंतर आता शिवसेना शिंदे गट ही आक्रमक झाला आहे. ज्या आमदाराने गोळीबार केला त्या आमदारांचे समर्थक भाजप कार्यकर्ते असल्याचे भासवण्याच्या कितीही प्रयत्न केला तरी ते भाजपचे नाहीत, भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय यांना एकत्र घेऊन श्रीकांत शिंदे काम करतात. त्यामुळे ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. आमदार गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केले ते निश्चितच चुकीचं आहे आणि जर त्यांचे समर्थक असा काही कांगावा करत असतील, युतीमध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न करु नये. तसेच गणपत गायकवाड यांना जामीन होईल, अशा भ्रमात त्यांनी राहू नये.

 

श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत अपप्रचार करू नये त्यामुळे युतीचं वातावरण बिघडू शकते. युतीचे वातावरण बिघडू नये यासाठी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने निश्चितपणे लक्ष द्यावं आणि त्या दृष्टीने असे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक युतीचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केली आहे . कल्याण पूर्व भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांचे बैठक झाली. या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा अन्यथा काम करणार नाही, असा इशारा दिला होता. या बैठकीतला शिवसेना शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलंय .

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;