एसटी स्टँड धुणारा, झाडू मारणाऱ्या कार्यकर्त्याला आमदार, खासदार केलं…आता तो पक्ष सोडून जातोय…

एसटी स्टँड धुणारा, झाडू मारणाऱ्या कार्यकर्त्याला आमदार, खासदार केलं…आता तो पक्ष सोडून जातोय…

लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात आयाराम-गयाराम सुरु झाले आहे. उमेदवारी न मिळालेले लोक दुसऱ्या पक्षाची वाट धरत आहे. आता जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील आणि करण पवार पवार यांनी भाजप सोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या कृतीवर भाजपचे मुख्य सहप्रवक्ते अजित चव्हाण यांनी टोला लगावला आहे. एसटी स्टँड धुणारा, झाडू मारणाऱ्या कार्यकर्त्याला गिरीश महाजन यांनी उचलले. भाजपने त्यांना आमदार, खासदार केले. ते सोडून जात असतील तर लोकच त्यांना निवडणुकीत उत्तर देतील, अशी खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.

काय म्हणाले अजित चव्हाण

भाजपचे मुख्य सहप्रवक्ते अजित चव्हाण हे आज जळगावात आले होते. यादरम्यान त्यांनी भाजपच्या अभियान संदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. आतापर्यंत गिरीश महाजन आणि भाजप यांचे झूल तुमच्या नाव पुढे होते. यामुळे तुम्ही निवडून येत होता. आता यापुढे बघू की तुम्ही काय करता. आपल्या वारसाला द्यावं तेवढं मंत्री गिरीश महाजन यांनी नाव दिलं. त्यांना ताकद दिली. त्यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी केले. आता तुम्ही जात आहात. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. सोडून गेलेल्या लोकांना आपली पात्रता काय आहे कळेल, या शब्दांत अजित चव्हाण यांनी उन्मेष पाटील यांच्यासह करण पवार यांना थेट आव्हान दिले.

माणूस जेव्हा पक्ष सोडून जातो तेव्हा त्याच्याकडे सांगण्यासारखं काही नसतं. तेव्हा तो असे कुठलेही आरोप करत असतो. इतके लवकर आपण बेमान कसू होवू शकतो. त्याचे हे देशातील अंत्यत दुर्दैवी उदाहरण आहे, असे अजित चव्हाण यांनी म्हटलं आहे.

उन्मेष पाटील ठाकरे गटात

उन्मेष पाटील जळगाव लोकसभा मतदार संघातून २०१९ मध्ये निवडून आले होते. त्यावेळी आधी स्मिता वाघ यांना तिकीट जाहीर केले होते. परंतु ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करुन उन्मेष पाटील यांना देण्यात आली होती. आता भाजपने जळगावमधून स्मिता वाघ यांना तिकीट दिले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;