एक किलो सोने, BMW कार असणाऱ्या काँग्रेस उमेदवारावर सासूला मारण्याचा आरोप

एक किलो सोने, BMW कार असणाऱ्या काँग्रेस उमेदवारावर सासूला मारण्याचा आरोप

देशभरात लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे. आयाराम गयाराम दिसू लागले आहे. तिकीट मिळालेल्या उमेदवारांनी आपला प्रचार सुरु केला आहे. वेगवेगळ्या उमेदवारांची चर्चा होऊ लागली आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र आला आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशातील 17 लोकसभेच्या जागांवर उमेदवार देत आहे. त्यात गाझियाबादच्या उमेदवार डॉली शर्मा आहे. त्यांनी नुकतेच आपले उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. त्यात संपत्तीसोबत दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली आहे. डॉल शर्मा विरोधात गाझियाबाद पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा त्यांची सासूने दाखल केला आहे. सासूला डॉली शर्मा यांनी घरात मारहाण केल्याचा हा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात डॉली शर्माने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर याला स्थगिती देण्यात आली.

काँग्रेस उमेदवार डॉली शर्मा यांनी निवडणूक शपथपत्रात संपत्ती आणि गुन्ह्याची माहिती दिली आहे. त्यांच्याकडे 2.14 कोटीची संपत्ती आहे. तसेच एक किलो सोना, अर्धा किलो चांदी, एक BMW कार आहे. त्यांची गाझियाबादमध्ये एक तर पंजाबमध्ये दोन घरे आहेत. त्यांनी एमबीएची पदवी घेतली आहे.

मागील निवडणुकीत डिपॉझिट जप्त

काँग्रेसने 2019 मध्येही डॉली शर्माला उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या. त्यांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले होते. या ठिकाणी भाजपचे उमेदवार जनरल व्ही.के.सिंह यांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यांना 9,44,503 मते मिळाली होती. सपाचे उमेदवार सुरेश बंसल (सपा-बसपा युती) दुसऱ्या क्रमांकावर होते. डॉली शर्मा केवळ 1,11,944 मते मिळवू शकल्या.

यंदा काय होणार

गाझियाबाद भाजपचा गड म्हटला जातो. परंतु यंदा परिस्थिती बदलत आहे. जनरल व्ही.के.सिंह यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपने आमदार अतुल गर्ग यांना उमेदवारी दिली. त्यामुळे व्ही.के. सिंह यांचे समर्थक नाराज आहेत. यामुळे काँग्रेसचे हे ब्राम्ह्यण कार्ड धक्कादायक निकाल लावू शकतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;