पुणेकरांचा हा नवीन पायंडा, विवाह मंडपातच वधू-वराकडून मतदानाची शपथ

पुणेकरांचा हा नवीन पायंडा, विवाह मंडपातच वधू-वराकडून मतदानाची शपथ

पुणेकर प्रत्येक गोष्टीसंदर्भात वेगळेच असतात. नवनवीन चांगल्या प्रथा राबवण्यात देशात पुणेकरांची आघाडी असते. यामुळेच ‘पुणे तेथे काय उणे’, असे म्हटले जाऊ लागले. मग लोकसभा निवडणुकीचा ‘माहौल’ असताना पुणेकर मागे कसे राहणार? लोकसभा निवडणुकीत जनजागृतीचा अनोखा फंडा पुणे शहरातील वधू-वरांनी राबवला. आंबगाव तालुक्यातील जवळे गावात अक्षय लोखंडे आणि उत्कर्षा घोडेकर यांच्या विवाह झाला. याविवाहाची तयारी सुरू असताना नवरदेवाची स्वारीही आली. यावेळी वरातीत मतदान करण्याचा संकल्प करण्यात आलेले बॅनर्स होते. मतदान जनजागृती फेरीतील विद्यार्थ्यांनी वऱ्हाडी मंडळीला मतदानाचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत सर्वांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.

विवाहाची मिरवणूक निघालेली होती. फेटे बांधलेले वराती लग्नासाठी आले होते. सनईच्या स्वरात सर्वांचे मंडपात दिलखुलास स्वागत झाले. लग्नघटिका समीप आली होती. वर-वधू नवीन जीवन सुरु करण्याच्या तयारीत होते. यावेळी सर्वांनी मतदानाचा संकल्प करून टाकला. तसेच इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले.

ज्येष्ठांचा आशीर्वाद अन् मतदानाचा संकल्प

विवाहात ज्येष्ठांनी आशीर्वाद देतानाच थोरा मोठ्यांचा मान ठेवण्याचा, सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा संदेश दिला. प्रत्येकाने एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी नव्या संसाराची सुरुवात येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा संकल्प करुन नवविवाहीत जोडप्याने करुन एक मोठा सामाजिक संदेश समाजाला दिला.

स्वीप पथकाची जागृती

शिरुर लोकसभा मतदार संघाअंतर्गत आंबेगाव विधानसभा मतदार संघातील स्वीप पथक मतदार संघात ठिकठिकाणी मतदान जनजागृती करत आहे. जवळे गावात विवाहाच्या मिरवणुकीत मतदार जनजागृती करून वर-वधू आणि वऱ्हाडी मंडळींना मतदानाचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सर्वांनी मतदान संकल्प पत्र भरू दिले. या उपक्रमात स्वीप सदस्य नारायण गोरे, तुषार शिंदे, सुनिल भेके, सचिन तोडकर यांच्यासह जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

वधू-वर म्हणतात…

वधू असणारी उत्कर्षा घोडेकर म्हणते, जवळे गावात सून म्हणून प्रवेश करताना भारतीय नागरीक आणि आंबेगाव तालुक्यातील सजग मतदार म्हणून मतदान करेल आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रवृत्त करेल. वर अक्षय लोखंडे म्हणाले, संसाराच्या कर्तव्यासोबत मी देशाप्रती असणारे कर्तव्यही पार पाडणार आहेआणि मतदान करणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;