सख्या भावाने अजित पवार यांची साथ सोडली, पण शरद पवार यांचे हे नातेवाईक आले सोबत

सख्या भावाने अजित पवार यांची साथ सोडली, पण शरद पवार यांचे हे नातेवाईक आले सोबत

राज्यातील नाही तर देशाचे लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीकडे लागले आहे. बारामतीमध्ये पवार कुटुंबातील दोघांमध्ये लढत आहे. नणंद-भावजयमध्येच लढत होत आहे. राष्ट्रवादीतून बंडखोरी करुन वेगळी वाट धरणारे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यावेळी अजित पवार यांच्या विरोधात सर्व पवार कुटुंब गेले आहे. अजित पवार यांचे सख्ये बंधू श्रीनिवास पवार अजित पवार यांच्या विरोधात गेले आहे. त्यांनी अजित पवार यांच्यावर कठोर शब्दांत टीकाही केली होती. परंतु या संकटकाळात शरद पवार यांचे सावत्र थोरले भाऊ अजित पवार यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी अजित पवार यांना आपला पाठिंबा दिला.

घरावर लावला बोर्ड

एकीकडे अजित पवार यांच्या सख्या भावाने साथ सोडली. परंतु आता शरद पवार यांचे सावत्र थोरले बंधू अजित पवार यांच्या सोबतीला आले. त्यांनी घरावर बोर्ड लावत अजित पवार आणि सुनेत्रा पवार हेच आमचे कुटुंब असल्याचे म्हटले आहे. काटेवाडीतील शरद पवार यांचे थोरले सावत्र बंधू पांडुरंग पवार यांनी अजित पवार यांना साथ दिली आहे.

पांडुरंग पवार कुटुंब पूर्ण ताकतीने अजित पवार यांच्या बरोबर उभे राहिले आहे. एकीकडे एकीकडे अजित पवार यांच्या कुटुंबातील सख्ख्या नात्यातील लोकांनी साथ सोडली असताना शरद पवार यांच्या सावत्र भावाच्या कुटुंबाने मात्र अजित पवारांच्या बाजूने ठामपणे उभा राहण्याचा निर्धार केला आहे.

आम्ही अजितदादांना सोडणार नाही

पांडुरंग पवार ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना म्हणाले, आता माझे वय ७६ झाले आहे. परंतु मी लहाणपणापासून अजित पवार यांच्यासोबत राहिलो आहे. त्यांचे आमच्यावर प्रेम आहे आणि आमचेही त्यांच्यावर प्रेम आहे. यामुळे आम्ही अजितदादांची साथ सोडणार नाही. त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहोत.

बारामतीमधील ही लढत दोन पक्षांमधील राहिली नाही. एकाच कुटुंबातील दोन उमेदवारांमध्ये होत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार जोरात सुरु केला आहे. अजित पवार यांना विरोध करणारे विजय शिवतारेही आता शांत झाले आहे. यामुळे अजित पवार यांना आणखी एक दिलासा मिळाला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;