3 वर्षांच्या आतच पुन्हा एकनाथ खडसेंची घरवापसी होणार का ? पाहा काय आहे चर्चा

3 वर्षांच्या आतच पुन्हा एकनाथ खडसेंची घरवापसी होणार का ? पाहा काय आहे चर्चा

Eknath Khadse : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपात येणार का ? अशा चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. खडसे नुकतेच दिल्लीत गेले होते. दिल्ली दौऱ्यात त्यांनी भाजपच्या हायकमांडशी बैठक झाल्याचीही माहिती आहे. त्यामुळं लवकरच खडसेंची भाजपात घरवापसी होईल, अशी शक्यता आहे. भाजपात जायचंच असेल तर सर्वांना विश्वासात घेवूनच जाणार असं संकेत ही खडसेने दिले आहेत.

एकनाथ खडसे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. तर त्यांच्या सून रक्षा खडसे भाजपच्या विद्यमान खासदार असून भाजपनं रावेरमधून त्यांना पुन्हा लोकसभेचं तिकीट दिलं आहे. एकनाथ खडसे यांनी तब्येतीच्या कारणास्तव पवारांच्या राष्ट्रवादीकडून सूनेविरोधात लढण्यास नकारही दिला आहे. तर नाथाभाऊंनी भाजपात परतण्याचा निर्णय घेतल्यास पक्षही त्यांचं स्वागत करेल असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.

सध्याच्या खडसेंच्या दिल्ली दौऱ्याची जी चर्चा होतेय त्या दौऱ्यामागे स्वत: खडसेंनी सुप्रीम कोर्टातल्या केसचा दाखला दिलाय. तूर्तास तरी भाजपचा विचार नाही हेही खडसे म्हणाले आहेत. मात्र भाजपात जायचंच असेल तर कार्यकर्त्यांना विश्वासात घेवूनच जाणार, हेही सांगायचा खडसे विसरले नाहीत.

एप्रिल 2021 मध्ये खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र त्यांच्या सून रक्षा खडसे यांनी भाजपातच राहण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर खडसे शरद पवारांसोबत आहेत. मात्र आता पुन्हा भाजपवरुन चर्चा सुरु झाल्यात आहेत. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात खडसेंचे जिल्ह्यातलेच विरोधक गिरीश महाजनांनी खडसेंवरुन दावा केला होता.

जवळपास 40 वर्षे भाजपात राहून खडसेंनी फडणवीसांवर आरोप करत भाजपला सोडलं. त्यामुळं 3 वर्षांच्या आतच पुन्हा खडसेंची घरवापसी होणार का ? या प्रश्नाचं उत्तर पुढच्या 8-10 दिवसांतच स्पष्ट होईल. कारण खडसेंना यायचंच झालं तर रावेरमधल्या रक्षा खडसेंच्या मतदारसंघातील मतदानाआधीच तसा निर्णय घेतला जाईल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;