संजय निरुपम भाजपमध्ये जाणार? उद्या जाहीर करणार आपली भूमिका

संजय निरुपम भाजपमध्ये जाणार? उद्या जाहीर करणार आपली भूमिका

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी हा प्रस्ताव दिल्लीतील काँग्रेस हायकमांडकडे पाठवण्याची तयारी केली आहे. पक्षाची शिस्तपालन समिती त्यावर अंतिम निर्णय घेणार आहे. इंडिया आघाडीतील भागीदार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात ते वक्तव्य करत आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांचा मी प्रचार करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून निरुपम यांना हटवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “आम्ही त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून काढून टाकले आहे आणि त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईही सुरू केली आहे.”

राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात खासदार राहिलेले संजय निरुपम यांनी ठाकरे गटाकडून लोकसभेचे उमेदवार जाहीर केल्यापासून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय निरुपम उद्या जाहीर करणार भूमिका

काँग्रेसच्या विरोधात बंड करण्याच्या तयारीत असलेले संजय निरुपम उद्या आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यांनी म्हटले की, मी दिलेला एक आठवड्याचा कालावधी आज पूर्ण झाला आहे. त्यामुळे उद्या मी स्वतः निर्णय घेणार आहे.

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेच्या उमेदवारीवरुन संजय निरुपम नाराज होते. संजय निरुपम यांना या जागेवरून निवडणूक लढवण्याची इच्छा होती. पण ही जागा ठाकरे गटाकडे गेल्याने ते नाराज आहेत. उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर यांना येथून उमेदवारी जाहीर केली आहे. सध्या शिवसेनेचे गजानन कीर्तिकर येथून खासदार आहेत. त्यांनी 2019 च्या निवडणुकीत संजय निरुपम यांचा पराभव केला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर गजानन कीर्तिकर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. मात्र त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे गटात आहे. त्यांनाच येथून ठाकरे गटाने उमेदवारी दिलीये. त्यामुळे आता भाजप येथून कोणाला उमेदवापी देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षापुढे काँग्रेस नेतृत्वाने स्वत:ला कमकुवत होऊ देऊ नये, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय उद्धव ठाकरे गट एकही जागा जिंकू शकत नाही असं ते म्हणाले आहेत.

संजय निरुपम भाजपमध्ये जाणार?

संजय निरुपम आता भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी ते शिंदे गटात जातील अशी शक्यता देखील वर्तवली जात होती. संजय निरुपम म्हणाले की, त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मी हायकमांडच्या निर्णयाची वाट पाहत आहे. अन्यथा माझ्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;