भावना गवळी यांचा पत्ता कट, यवतमाळ-वाशिममधून राजश्री पाटील यांना उमेदवारी?

भावना गवळी यांचा पत्ता कट, यवतमाळ-वाशिममधून राजश्री पाटील यांना उमेदवारी?

हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिममधून लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भावना गवळी यांचे तिकीट कापलं जाणार आहे. भावना गवळी यांच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असली तरी भावना गवळी यांनी आपला दावा कायम ठेवला आहे. भावना गवळी या पाच वेळा खासदार आहेत. त्यामुळे त्याचा दावा कायम आहे. भावना गवळी यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे. त्यामुळे त्या मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. याआधी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. पण त्यांच्या सर्व्हेमध्ये भावना गवळी यांच्या विरोधात वातावरण असल्याने त्यांचं तिकीट कापलं जाणार अशी शक्यता आहे.

वाशिम-यवतमाळ लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त १ दिवस शिल्लक आहेत. मात्र अजून शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. याआधी या जागेसाठी संजय राठोड यांच्याही नावाची चर्चा होती. पण ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक नसल्याने आता राजश्री पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाकरे गटाकडून संजय देशमुखांना उमेदवारी

शिवसेना शिंदे गटाकडून अजून उमेदवार जाहीर झाला नसला तरी महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार हे देखील यवतमाळमध्ये आले होते. त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. रोहित पवार यांनी भावना गवळी यांना लक्ष्य केलं.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भावना गवळी यांना अजूनही उमेदवारी जाहीर न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये ही धाकधूक वाढली आहे. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस जवळ आला आहे. त्यामुळे उद्या काही तासात उमेदवार घोषित केला जाऊ शकतो.

भावना गवळी यांनी सलग पाचवेळा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. पण भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्याने त्यांच्या विरोधात वातावरण असल्याचं सर्व्हेमध्ये दिसून आलं आहे. त्यामुळे आता कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;