नवनीत राणा यांनी वाटलेल्या साड्या मच्छरदाणी की मासे पकडायच्या जाळ्या, विरोधकांनी घेरलं

नवनीत राणा यांनी वाटलेल्या साड्या मच्छरदाणी की मासे पकडायच्या जाळ्या, विरोधकांनी घेरलं

नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांना वाटलेल्या या साड्या मच्छरदाणी आहेत की मासे पकडायच्या जाळ्या? हा प्रश्न खुद्द मेळघाटातल्याच महिला विचारत आहेत. एकीकडे महिलांना उत्तरं देताना नवनीत राणांची भंबेरी उडाली आहे. दुसरीकडे विरोधक नवनीत राणांना घेरत आहेत. 2 कोटीच्या गाडीत फिरणाऱ्यांनी साडे १७ रुपयाची साडी वाटून अपमान केल्याची टीका बच्चू कडूं यांनी केली आहे. राणा दांपत्य दर होळीला मेळघाटातल्या आदिवासींसोबत होळी साजरी करतात. त्याचे वेगवेगळे व्हिडीओ राणा दाम्पत्याकडून शेअरही केले जाते. यंदा नवनीत राणांनी तिथल्या महिलांना साड्यांचं वाटप केलं. पण साड्यांचा दर्जा पाहून आदिवासी महिलांनी निकृष्ट साड्यांचीच होळी केली.

अमरावतीचं राणा दाम्पत्य कायम कोणत्या ना कोणत्या वादानं चर्चेत राहतं. यंदाच्या निवडणुकीत साड्यांचा मुद्द्यावरुन विरोधकांनी राणांना लक्ष्य केलंय. अमरावती लोकसभेत बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट आणि अचलपूर या ६ विधानसभा येतात. 2019 ला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा अपक्ष लढल्या, त्यांच्याविरोधात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ होते.

नवनीत राणा यांना 5 लाख 10 हजार 947, अडसूळांना 4 लाख 73 हजार 996 मतं पडली होती. नवनीत राणा 36 हजार 951 मतांनी जिंकल्या. त्यांच्या विजयात वंचित आघाडीनं घेतलेल्या 65 हजार 135 मतं महत्वाची ठरली. विजयानंतरच्या काहीच दिवसात नवनीत राणांनी राष्ट्रवादीशी जवळीक संपवून भाजप पुरस्कृत भूमिका घेतल्या.

यंदा नवनीत राणांनी थेट भाजपात प्रवेश करुन अमरावतीची उमेदवारी मिळवली आहे. गेल्यावेळी राणांना मिळालेलं ३६ हजारांचं मताधिक्क्य
फार मोठं नसलं, तरी यंदा चार पक्षांचे उमेदवार असल्यानं अमरावतीचा निकालाबाबत उत्सुकता असणार आहे.

अमरावतीत भाजपकडून नवनीत राणा, काँग्रेसकडून बळवंत वानखेडे, बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेकडून दिनेश बूब आणि वंचितच्या पाठिंब्यावर आनंदराज आंबेडकरांनी अर्ज भरलाय.

नवनीत राणा ज्या अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत तेथे यंदा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. प्रहारकडून राणा यांच्या विरोधात दिनेश बूब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकांच्या हितासाठी निवडणूक लढणार आणि जिंकणार असा निर्धार दिनेश बूब यांनी केला आहे. तर अमरावतीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं अशी विनंती नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना केली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;