भावना गवळी उमेदवारीवर ठाम, पण शिवसेनेकडून हे नाव चर्चेत

भावना गवळी उमेदवारीवर ठाम, पण शिवसेनेकडून हे नाव चर्चेत

Loksabha election : वाशिम-यवतमाळ लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक आहेत. मात्र अजून शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारीच जाहीर झालेली नाही. विद्यमान खासदार भावना गवळी अजूनही वेटिंगवरच असून त्यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीये. यवतमाळ-वाशिम मतदारसंघात भावना गवळी यांनीच उमेदवारीवर दावा केला आहे. मात्र संजय राठोड यांच्याही नावाची चर्चा असून, त्यांनी लोकसभा लढण्यास नकार दिल्याची माहिती आहे. पण राठोडांनी लढावं अशी इच्छा शिंदे गटाच्या कोअर टीमची आहे.

फडणवीसांची घेतली भेट

सोमवारी रात्री भावना गवळी यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. भावना गवळी की संजय राठोड या दोघांपैकी एकाचा फौसला अद्याप झालेला नसला तरी महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुखांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. संजय देशमुखांचा अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यवतमाळमध्ये आले होते. शक्तिप्रदर्शन करत संजय देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर झालेल्या सभेतून आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

रोहित पवारांनीही महायुतीकडे उमेदवार आहे का ? अशी टीका करत भावना गवळींना लक्ष केलं. तर लवकर उमेदवारी घोषित न करणे हा सुद्धा एक प्लॅन असतो असं मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. मेरी झांसी नहीं दूंगी म्हणत, शेवटच्या क्षणापर्यंत भावना गवळी उमेदवारीवर ठाम आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 2 दिवस राहिले असतानाही त्या मुंबईत तळ ठोकू आहेत.

तिकीट कापलं जाणार?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भावना गवळी यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवारी जाहीर न झाल्याने अनेक उमेदवारांची धाकधूक यामुळे वाढली आहे. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस जवळ येत असताना अनेक नेते आणि कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत.

भावना गवळी या विद्यमान खासदार आहेत. महत्त्वाचे म्हणजे सलग पाचवेळा त्या या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. पण भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे. त्यामुळे आता भावना गवळी यांना उमेदवारी मिळते की नाही, त्यांना उमेदवारी नाकारली तर मग कोणाला उमेदवारी दिली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;