माझ्या नेत्याने सांगितलं ते गोपनीय, आताच… नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून सस्पेन्स वाढवला

माझ्या नेत्याने सांगितलं ते गोपनीय, आताच… नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून सस्पेन्स वाढवला

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार भाजपने अजूनही जाहीर केलेला नाही. या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला आहे. मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना या मतदारसंघातून तिकीट देण्याचं घटत आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या हातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जातंय की काय? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच नारायण राणे यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. माझ्या नेत्याने मला जे सांगितलंय ते गोपनीय आहे. आताच सांगणार नाही, असं म्हणत राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गचा सस्पेन्स वाढवला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत स्पष्ट विधान केलं. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपचाच उमेदवार लढवेल. इथला उमेदवार पक्ष ठरवेल. कुणी लुडबुड करू नये. मी तिकीट मागायला गेलो नाही. बातम्या देताना विचार करा. माझं नाव जाहीर झाल्यास मी निवडणूक लढवले आणि जिंकेल. कुणीही बैठक, मेळावा बोलवू देत, काही होत नाही. दहीकाला प्रमाणे बैठक होत राहतात, शंकासुर कोण असेल माहीत नाही. आम्ही मतदारसंघ सोडणार नाही. त्यांची (किरण सामंत) यांची माहिती घ्या, असं नारायण राणे म्हणाले.

उमेदवारी मिळाली की जिंकेल

मला उमेदवारी मिळाली तर मी लढवले आणि जिंकेल. मला राजकारणात 56 वर्षे झाली आहेत. मला कुणी काहीही सांगितलेलं नाही. माझ्या पक्षाची ताकद मला माहीत आहे. मतदारसंघाचा माझा अभ्यास आहे. मी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना सांगितलं की, जी जबाबदारी मिळेल ती पार पाडणार. माझ्या नेत्यांनी मला काय सांगितलं ते गोपनीय आहे. आताच मी सांगणार नाही, असं राणे म्हणाले. तसेच उद्यापर्यंत रत्नागिरी- सिंधुदुर्गचा उमेदवार जाहीर होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कामधंदा न करता मर्सिडीज घेऊन कसे फिरता?

भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यावरही त्यांनी भाष्य केलं. आमच्या विजयाची आम्हाला खात्री आहे. आम्ही 400 पार करणार आहोत. उद्धव ठाकरेंनी पैसे घेऊन तिकिटे दिल्याची यादी माझ्याकडे आहे. काही लोकांना एके दिवशी पत्रकार परिषदेत आणून हे मी सांगेन. शंकर कांबळी प्रकरणात देखील हे झालं होत. जिंदाल नावाच्या उद्योगपतींकडून 50 लाख रुपये घेऊन तिकीट अचानक देण्यात आले होते. कामधंदा न करता हे मर्सिडीज घेऊन कसे फिरतात? यांची चौकशी होणार. यांना आम्ही सोडणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

तू लवकर तडीपार होणार

भारताचं दरडोई उत्पन्न 1 लाख 97 हजार झालं आहे. संरक्षण बजेट पूर्वी 2 लाख 24 हजार कोटी होतं. आता 5 लाख 94 हजार कोटी आहे हे देश सुरक्षित असण्याचं कारण आहे. देशाचा जीडीपी अनेक देशांच्या पुढे आहे हे उद्धव ठाकरेंनी बघावं. आमच्या नेत्याने केलेलं काम बघ. जनता तुला तडीपार करेल. तू मोदींना तडीपार बोलू नकोस. तू लवकरच तडीपार होणार आहेस, असा हल्लाच त्यांनी चढवला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;