महायुतीत या जागांचा तिढा अजून कायम, तिकीट कुणाला मिळणार याबाबत सस्पेंस

महायुतीत या जागांचा तिढा अजून कायम, तिकीट कुणाला मिळणार याबाबत सस्पेंस

Loksabha election : महायुतीत अजूनही काही जागांवर तिढा कायम आहे. यवतमाळ-वाशिममध्ये कोणाला उमेदवारी मिळणार हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळे यवतमाळमध्ये भावना गवळींचे कार्यकर्ते संतप्त झालेलं आहेत. दरम्यान संभाजीनगर, नाशिक, कल्याण डोंबिवली, ठाणे सिंधुदुर्गच्या जागेवरही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे महायुतीत बऱ्याच ठिकाणी नाराजीचा सूर आहे. भावना गवळींना उमेदवारी अद्याप जाहीर न झाल्यानं वाशिममध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेच आमने-सामने आले आहेत.

वाशिममध्ये दोन नावे चर्चेत

वाशिम यवतमाळच्या लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. मात्र, 3 दिवस शिल्लक असतानाही उमेदवारी जाहीर न झाल्यानं, सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.

वाशिम-यवतमाळमध्ये भावना गवळींसह मंत्री संजय राठोडांचंही नाव चर्चेत आहे. गवळींविरोधात सर्व्हे असून राठोडांनी लढावं अशी चर्चा शिंदे गटात झाल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. त्यामुळंच शिंदे गटाच्या पहिल्या यादीतही भावना गवळींचं नाव आलेलं नाही. आता कार्यकर्ते संतप्त झाल्यानंतर भावना गवळींनीही प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना असून शिंदे फडणवीस पुन्हा संधी देतील असं भावना गवळी म्हणाल्या आहेत.

ठाणे-कल्याणमध्ये ही सस्पेंस

फक्त वाशिम यवतमाळच नाही तर महायुतीत आणखी काही जागांचा तिढा कायम आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
छत्रपती संभाजीनगरची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे गेल्याचं कळतं आहे. मंत्री संदीपान भुमरेंची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे. ठाण्याची जागाही शिंदे गटाकडेच राहणार असून आमदार प्रताप सरनाईक आणि नरेश म्हस्केंचं नाव चर्चेत असून म्हस्केंचं नाव आघाडीवर आहे.

कल्याणमधून पुन्हा एकदा श्रीकांत शिंदेच उमेदवार असतील. तर पालघरची जागा भाजपच लढवणार असून भाजपचे उमेदवार राजेंद्र गावितांनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे. नाशिक आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच सुरुच आहे.

नाशिकमध्ये रस्सीखेच

नाशिकच्या जागेसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनी प्रचार सुरु केला आहे. तर इथं भाजपचे 3 आमदार आणि 100 नगसेवक असल्याचं सांगून भाजपनंही दावा केलाय. आणि ऐनवेळी भुजबळांनीही एंट्री केली आहे. दिल्लीत माझ्या नावाची चर्चा झाली असून अजित पवार गटाला जागा मिळावी असं भुजबळ म्हणाले आहेत. मात्र नाशिकची जागा आमचीच असल्याचं सांगून नाशिकचा सोडणं शक्य नसल्याचं शिंदे गट म्हणतोय.

इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरुन अजूनही अंतिम तोडगा निघताना दिसत नाही. भाजपकडून नारायण राणे तर शिंदेंच्या शिवसेनेकडून किरण सामंत या जागेवर इच्छुक आहेत. तर शिंदेंचेच मंत्री दीपक केसरकरांनी राणेंना पाठींबा दिला आहे. रविवारी केसरकरांसोबत दरेकर आणि प्रसाद लाड यांची बैठकही झाल्याचीही माहिती आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;