बॅग पॅकर्स – थरारक चंद्रखानी पास

बॅग पॅकर्स – थरारक चंद्रखानी पास

>> चैताली कानिटकर

अनेक वर्षांपूर्वी पासून मेंढपाळ आणि व्यापाऱ्यांनी प्रवास केलेला ऐतिहासिक मार्ग म्हणजे चंद्रखानी खिंड. मलाना पास नावाने ओळखला जाणारा चंद्रखानी पास ट्रेक, ज्यात निसर्गदर्शनासोबत त्यातला थरारही अनुभवता येतो.

हिमाचलमधील एक उंचावरील खिंड असलेला ट्रेक म्हणजे चंद्रखानी पास. खरे तर बियास आणि पार्वती खोऱयांना जोडणारी ही एकमेव जलवाहतूक असणारी खिंड आहे. अनेक वर्षांपूर्वी पासून मेंढपाळ आणि व्यापाऱयांनी प्रवास केलेला हा ऐतिहासिक मार्ग आहे. 18 व्या शतकाच्या प्रवासवर्णनांमध्येही चंद्रखानीचा उल्लेख आढळतो. तेव्हा त्याला मलाना पास असे म्हटले जात असे.

चंद्रखानी पास हा पाच दिवसांचा मध्यम स्वरूपाचा ट्रेक आहे. याची उंची 12185 फूट आहे आणि अंतर 25 किलोमीटर आहे. या ट्रेकच्या बेस कॅम्पला पोहोचण्यासाठी असलेलं रूमसू हे गाव पठाणकोट रेल्वे स्थानकापासून, तर भुंतर विमानतळापासून जवळचे आहे. येथे चंदिगढ – मनाली असेही येता येते. मनाली ते रूमसू गाव हे अंतर अवघ्या दोन तासांचे आहे. ट्रेकच्या पहिल्या दिवशी आम्ही या गागवात पोहोचलो. कथकुनी शैलीतील वास्तुकला आणि स्थानिक परंपरांची झलक दाखवणारे हिमाचली संस्कृतीने नटलेले हे रूमसू गाव. इथल्या स्थानिकांशी संवाद साधत पार्वती खोऱयातील लपलेल्या या गावातील रीतिरिवाज, मनमोहक लोककथा ऐकत आमचा प्रवास सुरूच होता.

दुसऱया दिवसाचा ट्रेक रूमसू ते नया टपरू हा साधरण चार-पाच तासांचा आहे. उन्हाळा व पावसाळा दोन्हीही ऋतूत हा ट्रेक करता येतो. तिसरा ट्रेकचा दिवस तसा लहान आहे. नया टपरू ते चकलानी असे अंतर अवघ्या दोन तासांचे आहे. उंच पाइन वृक्षांपासून ते मॅपल, ओक आणि शेवटी रोडोडेंड्रॉनपर्यंत अशी इथली जैवविविधता लक्ष वेधणारी आहे. जसजसे तुम्ही वर चढत जाता तसतसे झाडांची रांग, कुल्लू व्हॅलीच्या विस्तीर्ण गवताळ प्रदेशात आपण पोहोचतो. पीर पंजाल आणि धौलाधर पर्वतरांगांची बर्फाच्छादित शिखरे दिसू लागतात. या जंगलांमध्ये आणि चकलानीच्या कुरणांवर मोकळ्या जागेवर कॅम्पिंग करणे हा इथला अविस्मरणीय अनुभव आम्ही घेतला. हा ट्रेक बर्फाच्छादित शिखरांच्या विहंगम दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. नया टपरूपासून माऊंट हनुमान टिब्बा, फ्रेंडशिप पीक आणि इंद्रसन पीकसारखी भव्य शिखरे इथून दिसू लागतात.

पुढील दिवस समीटचा. चकलानी ते चंद्रखानी आणि परत नया टपरू हे अंतर पाच ते सहा तासांचे आहे, पण शेवटचा तासभर उतरण लागते. फोटोसेशनसाठी हा अगदी उत्तम ट्रेक. एका बाजूला हिमाच्छादित पर्वतरांगा, तर दुसऱ्या बाजूला पीर पंजाल आणि पार्वती पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. सर्व बाजूंनी पर्वतांनी वेढलेल्या खिंडीवर उभे राहणे जादुई वाटते. हे सर्व अनुभवताना ट्रेक पूर्ण केल्याचे वेगळे समाधान मिळते. चंद्रखानी खिंडीपर्यंतचा शेवटचा दोन किलोमीटरचा कडय़ाच्या पायवाटेचा प्रवास हा अधिक रोमांचक आणि अनोखा अनुभव देणारा आहे. दोन्ही बाजूंनी विहंगम दृश्ये असलेल्या अरुंद पायवाटेवरून चालणे हे साहसी तितकेच कठीण. पण ते पार पाडल्यानंतर मिळणरा आनंद अवर्णनीय असाच म्हणावा लागेल. ट्रेकचा शेवटचा दिवस नया टपरू ते रूमसू 2 तास व पुढे ड्राईव्हने मनाली असा आहे. चंद्रखानी खिंडीपर्यंतचा 20 किमीचा ट्रेक पाच दिवसांचा आहे. हा ट्रेक करताना शेवटच्या टप्प्यात चढण वाढू लागते.

ही खिंड मनालीपासून जवळ जवळ लगेचच चढता येते. म्हणजेच हिमाचलमधील इतर कोणत्याही खिंडीच्या ट्रेकपेक्षा त्यावर जाणे खूप सोपे आहे. येथे कोणतेही कठीण दगडी भाग नाहीत. हिमालयातील उंच ठिकाणच्या खिंडीबाबत हे दुर्मिळ म्हणावे लागेल. बहुतेक हिमालयीन खिंडी खूप उंचावर चढ असलेल्या असतात आणि त्यात मोठे कठीण दगडी भाग असतात. यामुळे चंद्रखानी खिंड चढाईला सोपी.

ही केवळ ट्रेकसाठी लोकप्रिय अशी हिमाचली खिंड नसून तिचे खोल ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. या उंचावर असलेल्या हिमालयीन खिंडीत ट्रेकिंगचे सर्व थरार अनुभवता येतात. म्हणूनच फक्त नवशिक्यांसाठी नव्हे तर सर्वच ट्रेकर्ससाठी चंद्रखानी ट्रेक हिमाचलचा सर्वात आवडता ट्रेक आहे.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ट्यूशनला चाललेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, तिघांना अटक ट्यूशनला चाललेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
कोलकात्यात बलात्काराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. दम दम परिसरात आणखी एक बलात्काराची घटना समोर आली आहे. ट्यूशनला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या...
देवदर्शनाहून परतत असताना टेम्पो ट्रॅव्हलर ट्रकला धडकली, अपघातात 18 जणांचा मृत्यू
Pune News – भरदिवसा बिबट्याचा धुमाकूळ, अंगणात खेळणाऱ्या मुलाला बिबट्याने ओढून नेले
घरात बसून सिगारेट फुकणार्‍यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍यावर बोलू नये, पालकमंत्री शिरसाट यांना दानवे यांचे सडेतोड उत्तर
लोणचं ठरू शकतं ‘विष’; खाण्यापूर्वी ‘या’ 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा, तुम्ही पण या चुका करता का?
भाजपच्या माजी सभागृह नेत्यासाठी एसटीपी निविदेचा अट्टहास, शिवसेनेचा आरोप
सागरी सुरक्षेत मोठी झेप! ISRO ने लॉन्च केलं नौदलाचं सर्वात शकक्तिशाली उपग्रह