कोकणवासियांची यंदा ‘पावसाळी दिवाळी’, मोथाच्या वादळी पावसाने केला भाताचा चोथा
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने रत्नागिरीला दिवसभर झोडपून काढले. मोथाच्या वादळी पावसाने भातपीकाचा “चोथा” करून टाकला आहे. यंदा रत्नागिरीकरांनी “पावसाळी दिवाळी” अनुभवली. गेल्या २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात ३३३ मिमी पाऊस पडला. पावसामुळे जिल्ह्यातील २७७ गावातील ३५५.३९ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे.
आज दिवसभर ढगाळ वातावरण आणि संततधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे हातातोंडाशी आलेले भातपीक नष्ट झाले आहे. परतीच्या पावसाचा २७७ गावातील १९२२ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतीचे सुमारे ३१ लाख रुपयांचे नुकसान झाले.सर्वाधिक नुकसान भातशेतीचे झाले आहे. ३४१.५८ हेक्टर क्षेत्रातील भातशेती उद्ध्वस्त झाली आहे. सर्वाधिक भातशेतीचे नुकसान मंडणगड तालुक्यात झाले आहे. ६८ गावातील १६६ हेक्टर क्षेत्रातील भात शेतीचे नुकसान झाले आहे.७९९ शेतकऱ्यांना फटका बसला असून नुकसानीचा आकडा १४ लाख १२ हजार रूपये इतका आहे. खेड तालुक्यातील ४५ गावातील ९३.११ हेक्टर शेती बाधित झाली असून नुकसानीचा आकडा ८ लाख ०२ हजार आहे.५०८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
दापोली तालुक्यातील २६ गावातील १५.३४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १ लाख ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ११० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील १५ गावातील २५.१० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १ लाख २९ हजाराचे नुकसान झाले आहे. ९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. चिपळूण तालुक्यातील २५ गावातील १४.२२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १ लाख २२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ५७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
लांजा तालुक्यातील २० गावातील ८.६६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ९२ हजाराचे नुकसान झाले आहे. ७५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यातील ३९ गावातील २५.७० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून २ लाख ५१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. १२३ शेतकरी बाधित झाले आहेत. राजापूर तालुक्यातील १२ गावातील ९.१२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ९२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ५५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील २७ गावातील ७.९६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १ लाख १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. १०५ शेतकरी बाधित झाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List