IND W vs SA W Final – पावसामुळे अंतिम सामना रद्द झाल्यास वर्ल्डकप कोण उंचावणार? जाणून घ्या नियम…

IND W vs SA W Final – पावसामुळे अंतिम सामना रद्द झाल्यास वर्ल्डकप कोण उंचावणार? जाणून घ्या नियम…

आयसीसी महिला विश्वचषकाचा अंतिम सामना यजमान हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये रंगणार आहे. रविवारी दुपारी तीन वाजल्यापासून नवी मुंबईच्या डीवाय पाटील मैदानावर हा सामना सुरू होईल. दोन्ही संघ पहिल्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी सज्ज असतानाच क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढवणारी बातमी आहे. 2 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम लढतीवर पावसाचे सावट आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाला तर विश्वचषक कोण उंचावणार? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.

पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा धुव्वा उडवत पहिल्यांदा फायनल गाठली, तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये हिंदुस्थानने 7 वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत तिसऱ्यांदा फायनल गाठली. 2 नोव्हेंबरला अंतिम सामना रंगणार असून यावर पावसाचे सावट आहे. AccuWeather च्या अंदाजानुसार, पावसाची शक्यता 63 टक्के असून सायंकाळच्या सुमारास जोरदार हवेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पहिला पर्याय –

आयसीसीच्या नियमानुसार 2 नोव्हेंबर रोजी किमान 20-20 षटकांचाही खेळ शक्य झाला नाही तर हा सामना 3 नोव्हेंबर या रिझर्व्ह डेच्या दिवशी खेळवला जाईल.

दुसरा पर्याय –

3 नोव्हेंबर रोजीही पावसाची शक्यता 55 टक्के असून त्या दिवशीही किमान 20-20 षटकांचा खेळ झाला नाही तर हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेला संयुक्त विजेते घोषित केले जाईल. 2002 मध्येही आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफीवेळीही हिंदुस्थान आणि श्रीलंकेला संयुक्तपणे विजयी घोषित करण्यात आले होते.

हिंदुस्थानी महिला वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत; स्पर्धेत अपराजित जगज्जेत्या ऑस्ट्रेलियावर हातोडा प्रहार, जेमिमा रॉड्रिग्जच्या शतकी खेळीने इतिहास रचला

धावांचा यशस्वी पाठलाग

दरम्यान, सेमीफायनल लढतीमध्ये हिंदुस्थानने 339 धावांचा यशस्वी पाठलाग करत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. जेमिमा रॉड्रिग्ज हिने नाबाद 127 धावांची शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. कर्णधार हरमनप्रीत कौर हिनेही तिला अर्धशतकीय (89) खेळी करत उत्तम साथ दिली.

“ऑस्ट्रेलियाला वाटत होतं, आणखी एक सेमीफायनल आरामात…”, हिंदुस्थानच्या पोरी फायनलमध्ये पोहोचताच सेहवागचा सिक्सर!

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रथिने आणि आर्यन समृद्ध असलेली तूर डाळ या लोकांसाठी ठरू शकते धोकादायक प्रथिने आणि आर्यन समृद्ध असलेली तूर डाळ या लोकांसाठी ठरू शकते धोकादायक
प्रत्येक कडधान्य, डाळ आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सर्वांनाच माहित आहे. प्रत्येक घरात डाळ ही बनतच असणार. कारण या...
PoK मध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन थांबवा, हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्रांमध्ये पुन्हा पाकिस्तानला फटकारले
Mega Block – रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
युक्रेनचा रशियाला मोठा धक्का, मॉस्कोजवळील कोल्टसेव्हॉय पाइपलाइनवर केला हल्ला
‘मानवी बॉम्ब’च्या धमकीनंतर जेद्दाहून हैदराबादला जाणारे इंडिगोचे विमान मुंबईकडे वळवले
Photo – मतचोरीविरोधात महाराष्ट्राचा सत्याचा मोर्चा
कोकणवासियांची यंदा ‘पावसाळी दिवाळी’, मोथाच्या वादळी पावसाने केला भाताचा चोथा